कांद्याची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 44 हजार 557 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 76 हजार 524 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 275 ते 1091 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 458 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
Weather Alert: गुढीपाडव्याला महाराष्ट्रात वादळाची एंट्री, सर्वदूर पाऊस कोसळणार, 31 जिल्ह्यांना अलर्ट
advertisement
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 939 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 354 क्विंटल लिंबास 2500 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल लिंबास 14560 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1659 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 850 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 12000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 382 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात 330 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 800 ते 1800 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला.





