TRENDING:

Shocking Crime : पाण्यावरुन महिलेशी बाचाबाची अन् सुरक्षारक्षकासोबत क्षणात होत्याचं नव्हतं झालं; डोंबिवलीतील घटना

Last Updated:

Dombivli Crime : डोंबिवली शहरातूल एका सुरक्षारक्षकासोबत घडलेला प्रकार पाहून सर्वजण हादरले आहे. ज्या संपूर्ण घटनेचे कारण फक्त पाणी होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : गावात किंवा शहराच्या काही भागात अजूनही अनेकजण नळावर पाणी भरण्यासाठी जातात कितेकदा तिथं वादही होतात. पण सध्या डोंबिवलीतून समोर आलेले प्रकरण तितकेच धक्कादायक आहे. जिथं नळावरील वादातून एकाची हत्या करण्यात आलेली आहे.
डोंबिवलीत नळावरील भांडणातून सुरक्षा रक्षकाचा बळी
डोंबिवलीत नळावरील भांडणातून सुरक्षा रक्षकाचा बळी
advertisement

नेमके घडले काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचे नाव उमेश वाघ असून तो एक सुरक्षारक्षक होता. मंगळवारी साधारण संध्याकाळची वेळ होती तेव्हा उमेश हा कोपर परिसरातील एका भागात नळावर हातपाय धूत होता. तेव्हाच तिथं असलेली एक महिला उमेशला त्या नळावर हातपाय का धूत होतास आणि पाणी का वाया घालवतोस म्हणून त्याला ओरडली. मग त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.

advertisement

महिलेचा पती तिथं येताच...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

महिला आणि उमेश यांच्यात वाद झाल्यानंतर त्यामहिलेचा पती अक्षय जाधव तिथं आला आणि दोघांमध्येही वाद झाला. त्यानंतर उमेश रात्री रेल्वेच्या कामाच्या ठिकाणी गेला जो तिथं सुरक्षारक्षकाचे काम करतो. साधारण 11 वाजता अक्षय हा उमेश जवळ पोहचला आणि परत एकदा वाद घालण्यास सुरुवात केली. धक्कादायक गोष्ट म्हणजे अक्षयने रागाच्या भरात लोखंडी सळई घेतली आणि उमेशच्या डोक्यात मारली. सळईचा वार इतका जोरदार होता की उमेशचा त्यात मृत्यू झाला.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking Crime : पाण्यावरुन महिलेशी बाचाबाची अन् सुरक्षारक्षकासोबत क्षणात होत्याचं नव्हतं झालं; डोंबिवलीतील घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल