TRENDING:

कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video

Last Updated:

Pune News: अनेक केटरर्सनी घेतलेल्या ऑर्डर्स रद्द करण्यास सुरुवात केली असून त्यामुळे वधू-वरांच्या कुटुंबियांपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: इराण आणि इस्त्राईल, अमेरिका संघर्षामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची टंचाई जाणवू लागली असून त्याचा फटका हॉटेल आणि केटरिंग व्यवसायाला बसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याविषयी पिंपरी चिंचवड केटरर्स असोसिएशन अध्यक्ष अण्णा कुदळे यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement

इराण-इस्त्राईल युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत होणारे सुमारे 10 ते 12 हजार लग्नसोहळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. गॅसअभावी अनेक केटरर्सनी घेतलेल्या ऑर्डर्स रद्द करण्यास सुरुवात केली असून त्यामुळे वधू-वरांच्या कुटुंबियांपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अण्णा कुदळे यांनी सांगितलं की, या अचानक आलेल्या संकटामुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. यामुळे अनेक ऑर्डर्स रद्द कराव्या लागत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात लग्नाचे जवळपास 30 मुहूर्त आहेत, आणि ऐन सीझनच्या वेळी हे संकट उभे राहिले आहे. हा काळ व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण वर्षभरचे उत्पन्न या काळावर अवलंबून असते. ऑर्डर्स रद्द झाल्यामुळे वधू-वरांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

advertisement

इस्त्रायल-इराण युद्धाचा इंटरनेटला फटका? भारतातील डिजिटल सेवांवर काय होईल परिणाम?

View More

गॅस तुटवड्यामुळे लग्नसमारंभ संकटात

शहरात एप्रिल आणि मे महिन्यात तब्बल 30 लग्नमुहूर्त ठरलेले होते. एकूण 12 हजारहून अधिक लग्नांचे आयोजन झालेले होते, मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे आता हे समारंभ रद्द करावे लागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती गेल्या चार दिवसांत 400 रुपये वाढून 1600 रुपयांवर पोहोचल्या आहेत. मात्र, काळ्या बाजारात एका सिलिंडरसाठी 5000 रुपये मोजावे लागत आहेत, जे व्यावसायिकांसाठी मोठा धक्का आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
सर्व पहा

या संकटामुळे फक्त लग्न उद्योगावरच नाही, तर अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरही गंभीर परिणाम झाला आहे. व्यावसायिकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे आणि रोजगारावरही संकट निर्माण झालेले आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड केटरर्स असोसिएशन अध्यक्ष अण्णा कुदळे यांनी सरकारकडे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

मराठी बातम्या/पुणे/
कन्यादानाला तयार, पण अन्नदानाचं काय? इराण युद्धामुळं पुण्यातली लग्नं रद्द होण्याची वेळ, काय घडतंय? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल