TRENDING:

Shawarma Stall : डोंबिवलीची शोरमा गर्ल हरली नाही तर लढली; अखेर महिन्यानंतर मिळाला स्टॉल

Last Updated:

Shawarma Girl Ekta Sawant : गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील एका शॉरमा व्यवयास असलेल्या तरुणीची चर्चा सर्वत्र होत होती. अखेर या तरुणीला तिचा व्यवसाय करण्यासाठी असलेला अडथळा पूर्णपणे बंद झालेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली शहरात एका तरुणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. तो व्हिडिओ म्हणजे डोंबिवलीतील शोरमा गर्लचा. विशेष म्हणजे या तरुणीला पाठिंबा थेट राज ठाकरेंचा होता. नेमका हे प्रकरण काय आहे आणि ही तरुणी काय चर्चेत आली ते सविस्तर जाणून घेऊयात.
MNS support for Marathi woman vendor in Dombivli
MNS support for Marathi woman vendor in Dombivli
advertisement

डोंबिवलीतील नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीती ही शोरमा गर्ल म्हणजे या तरुणीचे नाव एकता सांवत असे आहे. जी एक डोंबिवलीतील मराठी तरुणी असून डोंबिवली पूर्वच्या स्टेशनजवळ शोरमाचा स्टॉल लावत होती. मात्र गेल्या महिन्यांपासून या तरुणीला कायद्याचा धाक दाखवून तिला हा स्टॉल लावून दिला जात नव्हता.

इतरांना परवानगी, मग एका स्टॉलवरच कारवाई का?

advertisement

डोंबिवली स्थानकाच्या परिसरात हा स्टॉल 150 मीटरच्या आत येत होता त्यामुळे तिच्यावर वारंवार कारवाई होत होती. मात्र एकताच्या मते तिच्याच बाजूला अनेक परप्रांतीयाचे ही स्टॉल होते पण त्यांच्या वर कोणतीही कारवाई होत नसे असे तिचे मत होते. त्यानंतर तिच्या या आरोपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होतो.

व्हायरल व्हिडिओची दखल राज ठाकरेंनी घेतली

advertisement

शोरमा गर्लचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले ही ते थेटे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेपर्यंत पाहिले गेले. ज्या व्हिडिओत ही तरुणी तिच्या व्यवसायावर होत असलेल्या कारवाईने रडत असल्याचे दिसले मग थेट याची दखल राज ठाकरें यांनी घेत अविनाश जाधव यांना या प्रकरणात लक्ष देण्याच्या सुचना देण्यात आल्या.

advertisement

मनसे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव थेट स्टॉलवर

शोरमा गर्लचे व्हिडिओ पाहिल्यानंतर अविनाश जाधव यांनी डोंबिलीत गेले आणि एकता सावंतच्या स्टॉलवर जाऊन तिची भेट घेतली. ज्यात तिला त्यांनी तक्रारी आणि तिचे अनेक प्रश्न ऐकून घेतले शिवाय तिला त्याच जागी नवा स्टॉल लावण्याचेही आश्वासनही देण्यात आले.

अविनाश जाधवांच्या हस्ते नव्या स्टॉलचं थाटात उद्घाटन

advertisement

बुधवारी मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या हस्ते डोंबिवलीतील शोरमा स्टॉल पुन्हा त्याच ठिकाणी सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे स्टॉल पुन्हा सुरू करताना एकता सावंत म्हणाली की,''अविनाश जाधव यांनी मला मानसिक बळ दिले. मराठी माणसाने व्यवसाय करावा, हेच माझे स्वप्न आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधी येथे आले तर तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असेल.

View this post on Instagram

सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

डोंबिवलीच्या शोरमा गर्लचा हा व्यवसाय पुन्हा सुरु झाला असून संपूर्ण स्टॉल उद्धाटनाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. ऐवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कौतुकांचा वर्षाव केलेला आहे. एका यूजर्संनी म्हटले आहे,''भावा आजून किती मन जिंकशील,जय मराठी जय मनसे'' तर काही यूजर्संनी,''अभिनंदन ताई'' अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shawarma Stall : डोंबिवलीची शोरमा गर्ल हरली नाही तर लढली; अखेर महिन्यानंतर मिळाला स्टॉल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल