कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार नरेंद्र पवार हे एका लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमाला हजर झाले होते. यावेळी त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी नरेंद्र पवार यांच्या नोटा उधळल्या. यावेळी एका गायकाने साहेबांसाठी खास गाणं गायलं, त्यानंतर समर्थकांनी आमदार साहेबांवर नोटांचा पाऊस पाडला.
advertisement
आता समर्थकांनी नोटा उधळल्या हे पाहून माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही ठेका धरला. त्यानंतर समर्थकांनी नरेंद्र पवार यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि सगळ्यांनी जोरदार डान्स केला. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ पवार यांनी त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल झाला आहे.
advertisement
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 7:15 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
'साहेबांची बरोबरी सोप्पी नाय', भाजपच्या माजी आमदारावर उधळल्या नोटा, खांद्यावर घेऊन नाचले, VIDEO व्हायरल
