TRENDING:

Thane Kalyan-Shil Road : मोठी बातमी! कल्याण शिळ रोड पुढील 26 दिवस वाहतूकीस बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Last Updated:

Thane Kalyan-Shil Road : कल्याण आणि ठाणे असा प्रवास करताना असलेल्या महत्त्वाच्या मार्गावर मोठे वाहतूक बदल लागू करण्यात आलेले आहे. वाहनचालकांनी प्रवास करण्यासाठी बदलांची माहिती जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : ठाणे आणि कल्याण शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. येत्या काही दिवसांत रस्ते मार्गाने प्रवास अवघड होणार आहे. नक्की कोणती समस्या आणि कोणत्या कारणांमुळे या शहरातील नागरिकांना त्रास होणार आहे,त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
kalyan shil road night traffic restrictions march 2026
kalyan shil road night traffic restrictions march 2026
advertisement

वाहतुकीत मोठे बदल लागू

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे वाहतूक पोलिसांकडून ठाणे आणि कल्याणमधील नागरिकांना महत्त्वाचे आवाहान केले आहे. ज्यात कल्याण-शिळ रोडवर मेट्रो-12 या प्रकल्पाचे काम सुरु आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

वेळ आणि तारीख नोट करा

ही वाहतूक बंदी 6 मार्चपासून सुरु झाली असून 31 मार्च 2026 या तारखेपंर्यत रात्री 11 वाजून 55 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू असणार आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी मोठ्या सिमेंट गर्डर बसवण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे, यासाठी जड गॅन्ट्री मशीनचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

advertisement

असा असेल वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग

1) 6 मार्च ते 10 मार्च दरम्यान शिळफाटा ते कल्याणकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सोनारपाडा पिलर क्रमांक 180 येथे प्रवेश बंद असेल. वाहनचालकांनी येथे डावीकडे वळून सर्विस रोडमार्गे डी.एन.एस. चौक मार्गे पुढे जावे.

2)11 मार्च ते 18 मार्च दरम्यान विक्रमानगर पिलर क्रमांक 105 येथे वाहतूक थांबवण्यात येणार आहे. या काळात वाहनांनी सर्विस रोडचा वापर करावा.

advertisement

3) 19 मार्च ते 25 मार्च दरम्यान मानपाडा चौक पिलर क्रमांक 200 परिसरात वाहतुकीवर निर्बंध लागू राहतील तर वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

4) 26 मार्च ते 31 मार्च दरम्यान सोनारपाडा पिलर क्रमांक 146 येथे रात्रीच्या वेळेत वाहतूक बंद राहील. वाहनचालकांनी सर्विस रोड आणि डी.एन.एस. चौक मार्गे प्रवास करावा. ठाणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आणि शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Thane Kalyan-Shil Road : मोठी बातमी! कल्याण शिळ रोड पुढील 26 दिवस वाहतूकीस बंद; पर्यायी मार्ग कोणते?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल