मुक्या जिवाचा कळवळा पडला महागात
पीडित महिला किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. नांदिवलीतील एका हेअर कटिंग सलूनसमोर एक दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला बसलेल्या श्वानाच्या पिल्लाला धडक दिली. हे पाहून प्राणिमित्र असलेल्या महिलेने त्या चालकाला जाब विचारला. यावर चालक संतापला आणि त्याने पिल्लाला बॅगने मारहाण केली. ''तुम्हाला काय करायचे आहे? हा तुमच्या घरचा कुत्रा आहे का? मी त्याला मारून टाकेन,'' अशा शब्दांत त्याने महिलेला धमकावले.
advertisement
महिलेने त्याला असे का मारत आहात असे विचारताच आरोपीने तिला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर प्राणिमित्र अजय मालवणकर यांच्या पुढाकाराने मानपाडा पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. तसेच महिलेला मारहाण होत असताना परिसरातील कोणीही मदतीला धावले नाही याबाबतही संताप व्यक्त करण्यात आला आहे.
