आमदार राजन साळवी यांनी उत्पन्नापेक्षा अधिक अपसंपदा जमा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रायगडचे एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाडावे यांनी तक्रार दिली आहे. रायगड एसीबी कार्यालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची चौकशी रत्नागिरी एसीबीचे डीवायएसपी सुशांत चव्हाण करणार आहेत. राजन साळवी यांनी 3 कोटी 53 लाखची अपसंपदा जमा केल्याचा आरोप एसबीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजन साळवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान आतापर्यंत एकूण सहावेळा राजन साळवी हे एसबीच्या चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेले आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आज सकाळीच त्यांच्या घरी एसबीचं पथक दाखल झालं. राजन साळवी यांच्या घराची पथकानं झडती घेतली. साळवी यांच्या घरातील वस्तूची आणि सामानाची नोंद घेण्यात आली. दरम्यान साळवी यांचे जुने घर आणि हॉटेलवरही एसबीचं पथक पोहोचलं.
