दरम्यान आतापर्यंत एकूण सहावेळा राजन साळवी हे एसबीच्या चौकशीसाठी अलिबाग येथील कार्यालयात हजर राहिलेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या घरी एसबीचं पथक दाखल झालं आहे, राजन साळवी यांच्या घराची झडती सुरू आहे. साळवी यांच्या घरातील वस्तूची आणि सामानाची नोंद घेतली जात आहे. दरम्यान साळवी यांचे जुने घर आणि हॉटेलवरही एसबीचं पथक पोहोचलं आहे. तिथेही झडती सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
advertisement
राजन साळवी यांची प्रतिक्रिया
राजन साळवी ही व्यक्ती काय आहे आणि कशी आहे? हे माझ्या पक्षाला माहिती आहे, माझ्या लोकांना माहित आहे, माझ्या कुटुंबाला माहिती आहे, त्यामुळे मी या गोष्टींची काळजी करत नाही. माझा पक्ष माझ्या पाठिशी आहे. अशी प्रतिक्रिया यावर राजन साळवी यांनी दिली आहे.
Location :
Ratnagiri,Ratnagiri,Maharashtra
First Published :
January 18, 2024 11:49 AM IST
