याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाळंदे इथले रहिवाशी समुद्र किनाऱ्यावर गेले असता त्यांना मृतदेह दिसला. यानंतर त्यांनी दापोली पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. तरुणीच्या पाठीवर बॅग होती पण त्यात काहीही सापडले नाही. शेवटी बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासल्यानंतर दीक्षा मिलिंद माने ही हरवल्याची तक्रार देण्यात आल्याचं पोलिसांना समजलं. मृतदेहाचा फोटो चिपळूण पोलिसांना पाठवून नातेवाईकांकडून दीक्षाच असल्याची खात्री करण्यात आली.
advertisement
दीक्षा शुक्रवारी सकाळी कॉलेजला जात असल्याचं सांगून निघाली होती. मात्र ती पुन्हा परत आलीच नाही. शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने शेवटी पोलिसात हरवल्याची तक्रार देण्यात आली. दीक्षाने शुक्रवारी सायंकाळी हर्णे समुद्रकिनारी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. शवविच्छेदन अहवालानुसार तिचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलंय.
दरम्यान, दीक्षाने घरातून जाताना एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ती सापडली असून त्यात मी घर सोडून जात आहे. माझा शोध घेऊ नका असं लिहिल्याचं समजते. मात्र पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. दीक्षाच्या घरी तिचे आई-वडिल आणि दोन बहिणी आहेत. दीक्षा सर्वात मोठी असून ती चिपळूणला बारावीमध्ये शिकत होती.
