अचानकपणे आकडी आली अन्...
सांची सावंत या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. गुरुवारी रात्री त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रसूतीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी त्यांना अचानकपणे आकडी आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्यांना अधिक उपचारांसाठी शहरातीलच दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचारांदरम्यान शुक्रवारी दुपारी 3.18 वाजताच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
advertisement
सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर
सांची सावंत यांचे पतीही पोलिस विभागातील श्वान पथकात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला आधीच दोन मुली असून, सांची या तिसऱ्यांदा गरोदर असताना हा दुर्दैवी प्रसंग घडला. त्यांच्या मृत्यूमुळे सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेची माहिती मिळताच, सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास सांची यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. तसेच, पोलिस अधिक्षक कार्यालय, शहर पोलिस ठाणे, श्वान पथकातील पोलिस कर्मचारी आणि शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील हे तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते.
