घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मालवणमध्ये पहिल्या पतीने पत्नीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. यात 35 वर्षे प्रीती केळुस्कर यांचं निधन झाल आहे. सुशांत गोवेकर असं या प्रकरणातील आरोपी पतीचं नाव आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी आता त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
काल सायंकाळच्या सुमारास ही घटना मालवण एसटी बसस्थानक परिसरात घडली आहे. प्रीती केळुस्कर या एका शॉपमध्ये काम करत असताना पतीने भर बाजारात येऊन त्याच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यांना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपाचर सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे, मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
advertisement
