कोकण रेल्वेकडून 9 ट्रेन्सदेखील रद्द करण्यात आल्या आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मांडवी आणि मंगळुरु एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री तीन वाजल्यापासून गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. ती आता हळूहळू पूर्ववत होत आहे.
गेल्या काही काळापासून पेडणे येथील बोगद्यामध्ये पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या कारणावरून बंद असलेली कोकण रेल्वेच्या पेडणे येथील बोगद्यातील वहातूक पूर्ववत करण्यात आली आहे. पाहिली ट्रेन पेडणे बोगद्यातून 22: 34 ला रवाना झाली आहे.
advertisement
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे गेल्या कित्येक तासापासून त्या त्या स्थानकात रखडलेले प्रवासी आता रत्नागिरी दिवा या पॅसेंजरने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. अनेक गाड्या रद्द करण्यात आलेले आहेत वंदे भारत एक्सप्रेस असेल मांडवी एक्सप्रेस सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर अन्य तीन गाड्या मंगला एक्सप्रेस तसेच नेत्रवती एक्सप्रेस या गाड्या अन्य मार्गावरून वळविण्यात आले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर रखडलेले प्रवासी आता रत्नागिरी दिवा या पॅसेंजरने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत.
विविध स्थानकात थांबवून ठेवलेल्या सर्व ट्रेन रवाना झाल्या आहेत, अशी अधिकृत माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि.चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली. कोकण रेल्वे वरील वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर रत्नागिरी दिवा पॅसेंजर ने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध स्थानकात रखडलेले प्रवासी दिव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.
रस्ते वाहतूकही विस्कळीत
कोकणात घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचं सत्र सुरुच आहे. रत्नागिरीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंडणगड-बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळली आहे. तुळशी घाटात दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. तर मंडणगड ते अंबडवे यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम ,सुरु आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कटिंग करण्यात आले होते. त्यामुळे सतत या डोंगराची दरड कोसळत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
