महाविकास आघाडीमध्ये रायगडची जागा ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून रायगड लोकसभा मतदारसंघामधून अनंत गिते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अनंत गीते असं नाव असणाऱ्या आणखी दोन उमेदवारांनी देखील या मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दुसरीकडे महायुतीमध्ये रायगडची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे. राष्ट्रवादीकडून या जागेवर सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सुनील तटकरे नाव असलेल्या आणखी एका उमेदवारानं आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे यावेळी रायगड लोकसभा मतदारसंघातून तीन अनंत गीते तर दोन सुनील तटकरे निवडणूक लढवणार आहेत.
advertisement
दरम्यान गेल्यावेळी देखील सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यविरोधात सारखंच नाव असलेल्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. यामुळे मतदारांमध्ये मतदान करताना गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
