राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी निलेश राणे, नारायण राणे आणि आदित्य ठाकरे एकाच वेळी आल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजपचे कार्यकर्ते याठिकाणी आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मविआचे नेते एकत्र आले होते. राणेंना अडवण्यात आलं. दोरी लावून त्यांना रोखल्यानं नारायण राणेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर धावूनही गेले. आम्ही स्थानिक आहोत, हे कशाला लावलंय आमच्याकडे, त्यांच्याकडे कुठे आहे, हे चालणार नाही, खाली घ्या हे असं म्हणत दोरी काढण्यासाठी निलेश राणे आक्रमक झाले.
advertisement
एका बाजूला राणेंना अडवले असताना दुसऱ्या बाजूने पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुसऱ्या बाजूने वाट काढत बाहेर पडणं पसंद केलं. तर आदित्य ठाकरे यांनी ठिय्या मांडला होता. आदित्य ठाकरे आणि मविआचे नेते किल्ल्यावर दाखल झाले तेव्हा भाजपचे कार्यकर्ते आक्रकम झाले.
भ्रष्टाचार, नाकर्तेपणा हे सगळं उघड झालंय, त्यामुळे सरकारची बाजू चिडलेली दिसत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. वाद निर्माण करण्याची गरज नाहीय. दुर्घटना घडलीय ती बघायला वेगवेगळ्या पक्षाचे नेते येतायत. त्यांच्याशी स्थानिक नेत्यांनी वाद घालणं योग्य नाही असं म्हणत राणेंवर टीका केली.
राणे आणि आदित्य एकाच वेळी पोहोचले. यात पोलीस प्रशासनाला यात दोष देण्यात अर्थ नाही. ही जागा वादाची नाही. शिवाजी महाराजाचा पुतळा पडला, ही दु:खदायक घटना आहे आणि अशावेळी स्थानिकांनी असं वागणं हे योग्य नाही अशा शब्दात जयंत पाटील यांनी निलेश राणेंना सुनावलं.
