TRENDING:

तू पैसे भरून आला, आम्ही मेरीटवर; रॅगिंगला कंटाळून मेडिकलच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

Last Updated:

विद्यार्थी हर्षल महाले या विद्यार्थ्याने 1 डिसेंबर रोजी वसतिगृहातील खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रमोद पाटील, कर्जत, 07 डिसेंबर : कर्जत तालुक्यातील तासगावकर शिक्षण समूहाच्या वसतिगृहात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय हर्षल महालेने रॅगिंगमुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हर्षल महालेने 1 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. मित्रांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून हर्षलने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. त्याला गळफास घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या तीन सहकारी मित्रांवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तासगावकर शिक्षण समूहातील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी तेथील वसतिगृहातच राहून शिक्षण घेतात. वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेणारे विद्यार्थी 3 ऑक्टोबरपासून वसतिगृहात राहायला आले होते. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी भिवंडी येथील विद्यार्थी हर्षल महाले या विद्यार्थ्याने 1 डिसेंबर रोजी वसतिगृहातील खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली होती.

advertisement

कर्जत पोलिसांच्या पथकाने पुढील दोन दिवस चांदई येथील महाविद्यालयाच्या वसतिगृहात येवून चौकशी केली. या चौकशीदरम्यान पोलिसांना हर्षलच्या आत्महत्येचे धक्कादायक कारण समजले. हर्षलचा त्याच्या खोलीतील सहकारी आणि शेजारच्या खोलीत राहणाऱ्या आणखी दोन विद्यार्थ्यांनी मानसिक छळ केल्याचे तपासात निष्पन्न झाले. हर्षल महाले वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व्यवस्थापनामार्फत प्रवेश घेवून आला होता. त्याच्या खोलीतील सहकारी आणि शेजारच्या खोलीतील दोन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येऊन प्रवेश मिळवला होता. त्यामुळे ते तिघे हर्षलला सतत 'तू पैसे भरून आलाय,आम्ही गुणवत्ता प्राप्त करून आलोय', असे बोलून मानसिक छळ करीत होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

मानसिक छळवणुकीबाबत हर्षलने आपल्या घरी एकदाही सांगितले नव्हते.अखेर हे असह्य झाल्याने कपडे सुकत ठेवण्यासाठी आणलेल्या दोरीच्या सहाय्याने त्याने 1 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. आपल्याला होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल त्याने गळफास घेण्यापूर्वी खोलीमधील भिंत आणि कपाटावर अनेक ठिकाणी लिहून ठेवले होते. मोबाईल मध्ये देखील या सर्व गोष्टी साठवून ठेवल्या होत्या.या सर्व बाबींचा सखोल तपास करून कर्जत पोलिसांनी हर्षलच्या 3 मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसाशी संपर्क केला असता त्यांनी हा रॅगिंगचा प्रकार नसून,अधिक माहिती देण्यास नकार दिला.

advertisement

मराठी बातम्या/कोकण/
तू पैसे भरून आला, आम्ही मेरीटवर; रॅगिंगला कंटाळून मेडिकलच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल