नाराणय राणे म्हणाले की, फडणवीस आणि मी, बावनकुळे यांच्या मुलाच्या लग्नावरून विमानाने येत होतो. त्यावेळी विमानातून उतरल्यावर देवेंद्र फडणवीस चालत चालत माझ्याकडे आले आणि दादा जरा बाजूला या म्हणाले. मला बाजूला बोलवून घेतलं आणि म्हणाले दादा आता बस झालं. आमच्या भाजपमध्ये या.
फडणवीस यांनी भाजपमध्ये येण्याबाबत सांगताच मी त्यांना म्हटलं, अरे मी एका पक्षाचा नेता आहे आणि तु आम्हाला रस्त्यात अशा पद्धतीने विचारतोस? तु मला भेट आणि आपण भेटल्यावर याच्यावर बोलू. तू मला बोलव आपण बोलून यावर चर्चा करू असं सांगितलं. मी प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक निर्णय घेतो आणि पद मिळवायचा असेल तर त्या पदासाठी लायकीचा बनतो असं नारायण राणे म्हणाले.
advertisement
महायुतीमध्ये अजूनही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नाहीये. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नाते नारायण राणे तर शिवसेनेकडून किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा संदर्भातच चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. दुसरीकडे उदय सामंत यांनी विदर्भातील प्रचार दौऱ्यासंदर्भात चर्चा असल्याचं म्हटलंय.
