TRENDING:

नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घोषणा

Last Updated:

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व माथाडी संघटनेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा, रवींद्र चव्हाण म्हणाले कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य, अन्याय सहन करणार नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापन समितीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा सोमवारी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि संघाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
News18
News18
advertisement

तळागाळातील घटकांना न्याय देणार: रवींद्र चव्हाण

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय देणे हे आमचे ध्येय आहे. शासन आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखून कामगारांच्या समस्या सोडवण्याला आमचे प्राधान्य असेल. कोणावरही अन्याय होणार नाही आणि आम्ही तो सहनही करणार नाही, या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत."

advertisement

विमानतळ व्यवस्थापन समितीची नवी फळी

नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

संयुक्त सरचिटणीस: रुपेश धुमाळे

उपाध्यक्ष: किरण पवार, युहान केर्सी दोराबाजी आणि सुजित न्यायनिर्गुणे

सचिव: प्रभुदास भोईर, मुखांश नाईक आणि गजानन पाटील

अखिल भारतीय माथाडी संघटनेचीही घोषणा करण्या आली. याच कार्यक्रमात माथाडी संघटनेच्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली.

advertisement

रायगड जिल्हा अध्यक्ष: जितेश शिंदे

भिवंडी-पालघर जिल्हा उपाध्यक्ष: सचिन जोशी

ठाणे-उरण उपाध्यक्ष: विक्रांत भोसले

दक्षिण मुंबई उपाध्यक्ष: राहुल लहासे

वरळी विधानसभा अध्यक्ष: शैलेश तोडकरी

वरळी विधानसभा सरचिटणीस: समीर शेख

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघाचे सरचिटणीस सुहास माटे, संयुक्त सरचिटणीस रुपेश धुमाळे, योगेश आवळे, उपाध्यक्ष साई घोगळे, सचिव शरद येटम, कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र राऊत, निशांत गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.

advertisement

मराठी बातम्या/कोकण/
नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल