रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीमधून वायू गळती झाली आहे. त्या परिसरात असणाऱ्या तलारेवाडी येथील 40 ते 50 ग्रामस्थांना वायू बाधा झाली आहे. त्यात लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे. रूग्णांना रूग्णवाहिकेच्या माध्यमातून दवाखान्यात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर महिना भरातील ही दुसरी घटना असल्याने एमआयडीसीमधील एक्सल कंपनीसमोर ग्रामस्थानी गर्दी केली आहे.
advertisement
नागरिक संतप्त:
लोटे एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप या एमआयडीसीमुळे सहन करावा लागत आहे, असा आरोप या परिसरातील नागरिक सातत्याने करत आले आहेत. नागरिकांना एक्सल या कंपनीकडे वायू गळती संदर्भात या आधी देखील तक्रार केली होती. मात्र कंपनीने नागरिकांच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याचं समोर येत आहे. आता झालेल्या वायू गळतीमुळे 40 ते 50 नागरिकांवर उपचार सुरू आहेत.
