याबाबत मिळालेली माहिती अशी की, कालिदास झणझणे हे मूळचे साताऱ्याचे असून सध्या ते ओरोस इथं राहतात. नेहमीप्रमाणे ते मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. तेव्हा मागून भरधाव वेगाने आलेल्या कारने झणझणे यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ते रस्त्यावरून ५० फूट अंतरावर जाऊन पडले.
गाडीची धडक बसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. पोलिसांना या अपघाताबाबत कळवण्यात आले. दरम्यान, स्थानिकांनी धडक देणाऱ्या कारचालकाला अडवले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, हायवा ट्रकने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास रोडवर एका वाहनाने तिघांना चिरडलं. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्त्यावर तिघांचे मृतदेह पडले होते तर रक्तामांसाचा चिखल झाला होता. या घटनेनंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली.
