सुषमा अंधारे आपला रायगड दौरा आटोपून बारामती दौऱ्यावर निघाल्या होत्या. त्यासाठी हेलिपॅडजवळ त्या पोहोचल्या होत्या आणि हेलिकॉप्टरची वाट पाहत होत्या. हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरत असतानाच क्रॅश झालं. यावेळी सुषमा अंधारे त्यांच्या फेसबूक पेजवर लाइव्ह करत होत्या. त्यामध्ये हेलिकॉप्टर क्रॅशची घटना शूट झाली आहे. हेलिकॉप्टर क्रॅश झालं तेव्हा पायलटने प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून स्वत:चा जीव वाचवला.
advertisement
सुषमा अंधारे यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, घटना FB लाइव्हमध्ये कैद; घटनास्थळावरचे PHOTO आले समोर
महाडमध्ये काल रात्री महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचार सभा आटोपून आज सकाळी सुषमा अंधारे या बारामती येथे मेळाव्यासाठी जाणार होत्या. एका खाजगी मैदानावर आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर एक दोन गिरट्या घालून कोसळले हे सर्व सुषमा अंधारे यांच्यासमोरच घडले.
दरम्यान, या अपघातामध्ये हेलिकॉप्टरचे पायलट आणि त्यांचा सहकारी हे सुखरूप आहेत. तसेच सुषमा अंधारे याही सुखरूप आहेत. याबाबत सुषमा अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता हा घातपात होता का? असे विचारले असता सध्या तरी मी या विषयावर बोलणार नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
