1. काकडी - आरोग्य तज्ञ प्रशांत देसाई यांच्या मते, दिवसातून रोज एक काकडी खाण आरोग्यसाठी खूप फायदेशीर ठरत, यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होते.
2. पाणी - पाणी हे आरोग्यसाठी नेहमीच फायदेशीर आणि गरजेचं मानलं जात. पण तुम्हालाही पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज 9 ग्लास पाणी प्यावं असं ते सांगतात.
advertisement
3. चालणं - आरोग्य तज्ञांच्या मते, रोज 3 किलोमीटर चालावं. चालणे हा शरीरासाठी एक उत्तम व्यायाम आहे. यामुळे अनेक फायदे होतात.
4. झोप - झोप आरोग्यसाठी किती फायदेशीर असते हे प्रत्येकाला माहित आहे. पण पुरेशी झोप घेतली नाही तर आरोग्यवर परिणाम होतो. झोप बेली फॅट कमी करण्यासाठी महत्वाची आहे त्यामुळे किमान 7 ते 9 तास चांगली झोप घ्यावी.
5. तिखट जेवण - आपण नेहमीच तिखट जेवण हानिकारक असू शकत हा विचार करून त्याला टाळतो. पण तिखट जेवण जेवल्याने बेली फॅट कमी होण्यास मदत होते.
6. साखर - अनेकदा आपल्याला गोड खाण खूप आवडत पण, डॉक्टर सुद्धा वजन कमी करायचं असो किंवा फिट राहायचं असो ते साखर टाळण्यासाठी सांगतात.
7. 2 तासांत खाव - तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक 2 तासांनी थोडं थोडं खावं. पोट खाली ठेवणं देखील आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकत. त्यामुळे थोडं थोडं आणि हेल्दी प्रत्येक 2 तासांनी खावं.
8. दीड ग्राम प्रोटीन - आपल्या आरोग्याला प्रोटीनची आवश्यक्ता असते. पण त्याच प्रमाणही तेवढंच गरजेचे आहे. त्यामुळे रोज दीड ग्राम प्रोटीन घ्या. त्यासाठी तुम्ही अंड, पनीर यांचे सेवन करू शकता.
9. ग्रीन टी - जेव्हा बेली फॅट कमी करायचा विचार येतो तेव्हा ग्रीन टी सर्वात पहिला येते. तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्याने बेली फॅट कमी होण्यास मदत होते.
10. घरच जेवण - बाहेरच्या जेवणात अनेकदा सोडा आणि इतर गोष्टींचा वापर केला जातो, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे नेहमी घरच जेवण जेवण्याचा सल्ला दिला जातो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)