TRENDING:

Bird Flu : 2 वर्षांच्या मुलाला पालकांनी भरवलं चिकन, झाला बर्ड फ्लू, मुलाचा मृत्यू

Last Updated:

Child death due to bird flu : 4 मार्च रोजी एम्स-मंगलगिरी इथं त्याला दाखल करण्यात आलं होतं. 7 मार्च रोजी डॉक्टरांनी नाकाच्या स्वॅबचे नमुने घेतले. तपासणीत हा विषाणू H5N1 असल्याचं आढळून आलं. त्याला बर्ड फ्लू असल्याची पुष्टी झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : चिकन म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. अगदी कित्येक लहान मुलांनाही चिकन आवडतं. पालकही आपल्या मुलांना चिकन खायला देतात. असाच अवध्या 2 वर्षांचा मुलगा ज्याला त्याच्या पालकांनी चिकन भरवलं. त्यानंतर या मुलाला बर्ड फ्लूची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशमधील ही धक्कादायक घटना आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

पालनाडू जिल्ह्यातील नरसरावपेट शहरातील ही घटना. 2 वर्षांच्या मुलाचा H5N1 मुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील बर्ड फ्लूमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. संपूर्ण भारतातील हे दुसरे प्रकरण आहे. 4 मार्च रोजी एम्स-मंगलगिरी इथं त्याला दाखल करण्यात आलं होतं.

7 मार्च रोजी डॉक्टरांनी नाकाच्या स्वॅबचे नमुने घेतले. रुग्णालयाच्या VRDL मध्ये इन्फ्लूएंझा A ची पुष्टी झाली. नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) प्रयोगशाळेत पुढील तपासणीत हा विषाणू H5N1 असल्याचं आढळून आलं. मुलीच्या मृत्यूपूर्वी एनआयव्ही पुणेने निकालांची पुन्हा पुष्टी केली. त्याच्यात बर्ड फ्लूची लक्षणं आढळून आली होती. 16 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला.

advertisement

पालकांनी दिलं होतं कच्चं मांस

मुलीच्या मृत्यूचं कारण कोंबडीचं कच्चं मांस असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुलीच्या पालकांनी सांगितलं की 28 फेब्रुवारीला मुलाला कच्चं मांस खायला दिल्याचं तिच्या आईवडिलांनी सांगितलं. त्यांनी हे यापूर्वीही अनेकदा केलं होतं आणि कोणतीही समस्या आली नाही. पण यावेळी त्याची तब्येत बिघडली. त्याला श्वास घ्यायला त्रास, अतिसार अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या. कुटुंबातील इतर सदस्यांनीही शिजवलेलं चिकन खाल्लं ते निरोगी आहेत.

advertisement

Fart Facts : पादताना आवाज का येतो? फार्टबाबत माहिती नसलेली गोष्ट

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, पशुसंवर्धन संचालक डॉ. टी. दामोदर नायडू यांनी सांगितलं की, बर्ड फ्लूचा विषाणू 60 ते 70 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात टिकू शकत नाही. त्यामुळे चिकन आणि अंडी पूर्णपणे शिजवून खाण्याचा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे.

बर्ड फ्लू म्हणजे काय?

advertisement

बर्ड फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. त्याला एव्हियन फ्लू असेही म्हणतात. पक्ष्यांचे आजार सहसा पक्ष्यांमध्ये, विशेषतः कोंबड्यांमध्ये पसरतात. अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये ते मानवांना देखील संक्रमित करू शकते. बर्ड फ्लूचे अनेक प्रकार आहेत. जसे की, H5N1, H7N9, H5N6, H5N8. हे प्रकार मानवांनाही संक्रमित करू शकतात.

Viral News : मस्करीत घेतला MRI करण्याचा निर्णय, तरुणीसोबत पण नंतर जे घडलं ते धक्कादायक

advertisement

आरोग्य तज्ञांच्या मते, मानवांमध्ये बर्ड फ्लू संसर्गाची बहुतेक प्रकरणे H5N1 प्रकाराची असतात. हा प्रकार इतका घातक आहे की त्याच्या संसर्गामुळे संक्रमित झालेल्या 10 पैकी 6 लोकांचा मृत्यू होतो.

बर्ड फ्लू मानवांमध्ये कसा पसरतो?

मानवांमध्ये बर्ड फ्लू पसरण्याची मुख्यतः चार कारणे आहेत.

संक्रमित पक्ष्यांना स्पर्श

संक्रमित पक्ष्यांच्या विष्ठेला किंवा अंथरुणाला स्पर्श

संक्रमित कोंबडी खाल्ल्याने

कोंबडी किंवा पक्षी विकल्या जाणाऱ्या ठिकाणांपासून देखील संसर्ग होऊ शकतो.

बर्ड फ्लूची लक्षणे काय आहेत?

पक्ष्यांमध्ये : श्वास घेण्यास त्रास होणे, शिंक येणे, उत्पादकता कमी होणे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

मानवांमध्ये : सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, अतिसार आणि श्वास घेण्यास त्रास होणे. तसेच गंभीर प्रकरणांमध्ये, न्यूमोनिया आणि हृदय गती वाढू शकते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Bird Flu : 2 वर्षांच्या मुलाला पालकांनी भरवलं चिकन, झाला बर्ड फ्लू, मुलाचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल