चॉकलेट ब्राउनी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 कप मैदा
1 छोटा चमचा बेकिंग पावडर
1/2 छोटा चमचा बेकिंग सोडा
75 ग्रॅम मऊ बटर
200 मिली कंडेन्स्ड मिल्क
1/4 कप बटरमिल्क
1/2 छोटा चमचा व्हॅनिला एसेंस
150 ग्रॅम वितळलेले डार्क चॉकलेट
3 मोठे चमचे साखर
1/4 कप बारीक चिरलेले अक्रोड
चॉकलेट ब्राउनी बनवण्याची पद्धत..
advertisement
- रेसिपीची सुरुवात चॉकलेट वितळवण्यापासून करा. मायक्रोवेव्ह-सेफ बाऊलमध्ये डार्क चॉकलेट आणि बटर एकत्र ठेवा. हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करा, चॉकलेट आणि बटर पूर्णपणे वितळून एकसारखे, चमकदार मिश्रण तयार झाल्यानंतर बाहेर काढा. बटर रूम टेंपरेचरवर असले तर चॉकलेटसोबत ते सहज मिसळते.
- आता या वितळलेल्या चॉकलेट मिश्रणात साखर, कंडेन्स्ड मिल्क, व्हॅनिला एसेंस आणि बटरमिल्क घाला. कंडेन्स्ड मिल्कमुळे ब्राउनी अधिक रिच आणि क्रीमी होते, तर ताक अंड्याचा पर्याय म्हणून वापरले जाते. ताकामुळे ब्राउनी सॉफ्ट आणि स्पंजी बनते. व्हिस्कच्या मदतीने हे मिश्रण नीट फेटून घ्या, जेणेकरून कुठल्याही गाठी राहणार नाहीत.
- यानंतर एका चाळणीमध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेऊन हे सगळे थेट ओल्या मिश्रणावर चाळून घ्या. असे केल्याने ब्राउनीमध्ये हवा मिसळते आणि ती हलकी होते. आता स्पॅटुलाच्या मदतीने ‘कट अँड फोल्ड’ पद्धतीने मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा. फार वेगाने फेटू नका. शेवटी बारीक चिरलेले अक्रोड घालून हलकेच मिसळा.
- आता एक मायक्रोवेव्ह-सेफ काचेचे भांडे घ्या आणि त्याला थोडेसे बटर लावून ग्रीस करा. तयार ब्राउनीचे बॅटर यात ओता आणि यावर आणखी थोडे अक्रोड टाका. हे भांडे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि 3 मिनिटांसाठी बेक करून घ्या.
- मायक्रोवेव्हमधून काढल्यानंतर लगेच ब्राउनी कापू नका. किमान 5 मिनिटे तिला रेस्ट द्या. या वेळेत ब्राउनी नीट सेट होते. त्यानंतर चौकोनी तुकडे करून वरून थोडी चॉकलेट सॉस किंवा व्हॅनिला आइस्क्रीमसोबत गरमागरम सर्व्ह करा. ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी ही 3 मिनिटांची ब्राउनी नक्कीच सगळ्यांची मनं जिंकून घेईल.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
