असं प्या जिरं पाणी
उपाशीपोटी जिरं पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. अनेक जण तसं करण्याचा सल्ला देतात. चयापचय किंवा गॅसेसच्या समस्यांसाठी अनेक जण तर रात्री जिरं भिजवून ठेवतात आणि सकाळी पाणी पितात. मात्र जिरं पाणी पिऊनही वजन कमी होत नसल्याच्या तक्रारी अनेक जण करतात. त्यांच्यासाठी या विशेष टीप्स
advertisement
योग्य पद्धतीने जिऱ्यांचं पाणी कसं तयार करावं?
पहिली पद्धत :- 1 चमचा जिरं पाण्यात टाकून ते 5-10 मिनिटे मध्यम आचेवर उकळा. पाणी उकळत असताना ते सतत ढवळत राहा. उकळलेलं पाणी थंड झाल्यावर गाळून प्या.
दुसरी पद्धत :- 1 चमचा जिरं रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. ते कमीतकमी 8 तास पाण्यात भिजून राहील याची काळजी घ्या. सकाळी उठल्यावर ते पाणी गरम न करता कपमध्ये गाळून प्या.
तिसरी पद्धत :- तुम्ही जिरं पाण्यात लिंबू आणि मध मिसळूनही ते पिऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडायला मदत होईल आणि शरीरातल्या ‘क’ जीवनसत्वाची भरपाई होईल.
चौथी पद्धत :- पाण्यामध्ये दालचिनी मिसळून प्यायल्यानेही वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. यामुळे तणावही कमी व्हायला मदत होते. डायबिटीस असलेल्या व्यक्तीसाठी हे खूप महत्वाचं आहे कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
पाचवी पद्धत :- भिजवलेल्या जिऱ्यामध्ये तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर घालू शकता. मात्र जिरे पाणी गाळून घेतल्यानंतर त्यात व्हिनेगर घाला.
वजन कमी करण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचे फायदे
एका अहवालानुसार, जिरं पाणी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिराच्या पाण्यात थायमॉल आणि इतर आवश्यक तेलांसारखी काही संयुगे असतात जी शरीराचा चयापचय दर वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे अधिक कॅलरीज बर्न होतात. हे चांगले पचन करण्यास आणि शरीराची जळजळ कमी करण्यास देखील मदत करते. जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने पोट भरल्यासारखं राहतं ज्यामुळे अतिरिक्त भूक नियंत्रित व्हायला मदत होते.