अमरावती : हिवाळा सुरू झालाय आणि आता मार्केटमध्ये नवनवीन स्कार्फ, स्टोल आणि हिवाळ्यात वापरण्यासाठी अनेक कपडे आलेले आहेत. अमरावतीमधील अंबादेवी मार्केट हे खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कमीत कमी किंमतीमध्ये चागले कपडे आणि वस्तू मिळतात. हिवाळ्यासाठी जर तुम्हाला स्कार्फ, मफलर, टी शर्ट, पँट खरेदी करायचे असतील तर तुम्ही अंबादेवी रोड वरील श्री बालाजी होजियरी येथून खरेदी करू शकता. येथे तुम्हाला अगदी परवडणाऱ्या रेंजमध्ये स्कार्फ आणि इतर कपडे सुद्धा मिळतील.
advertisement
अंबादेवी मार्केटमधील श्री बालाजी होजियरी या दुकानाचे मालक दिनेश सोनी हे सांगतात की, गेले 15 वर्षापासून ते हा व्यवसाय करत आहेत. जास्त नफा मिळावा हा उद्देश न ठेवता ग्राहकांना परवडेल आणि विक्रेत्याला तोटा होणार नाही असा रेंजमध्ये आम्ही आता पर्यंत विक्री करत आलो आहोत.
मार्केटच्या तुलनेत 50 रुपयांनी कमी किंमत
हिवाळ्यासाठी स्पेशल स्टोल आहेत. ज्याची किंमत मार्केटमध्ये इतर ठिकाणी 180 ते 200 रुपये अशी आहे. त्यापेक्षा कमी किंमतमध्ये ते विकत सुद्धा नाहीत. आपल्याकडे तेच 200 रुपयांना मिळणारे स्टोल 150 रुपयांत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 150 रुपयांना मिळणारे कॉटन आणि रिओनचे स्टोल 120 रुपयांत उपलब्ध आहेत. 100 रुपयांना मिळणारा स्कार्फ 60 रुपयांत आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पॅटर्नमध्ये पन्नासच्यावर कलर्स उपलब्ध आहेत.
स्टोन रोल, मोती अन् लेस घ्या होलसेल दरात, पुण्यातील प्रसिद्ध मार्केट माहितीये का?
150 रुपयांत टी शर्ट आणि 200 रुपयांत बॅगी पँट
पुढे ते सांगतात, स्टोल सोबतच घरी घालण्यासाठी प्लाझो पँट आणि टी शर्ट सुद्धा उपलब्ध आहेत. ते दोन्ही तुम्हाला 150 रुपयांपासून खरेदी करायला मिळेल. जॉगर पँट 250 रुपयांत उपलब्ध आहेत, इतर ठिकाणी 300 ते 350 रुपये अशी रेंज आहे. ट्राउझर पँट तुम्हाला 200 रुपयांत उपलब्ध आहेत. बॅगी पँट सुद्धा फक्त 200 रुपयांत आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमच्याकडे असलेल्या प्रत्येक कपड्यांची किंमत ही मार्केट मधल्या पेक्षा कमीच असेल, तुम्ही नक्की भेट देऊन बघा. आमचा पत्ता आहे अंबादेवी मार्केट, गांधी चौक श्री बालाजी होजियरी, असे त्यांनी सांगितले.





