advertisement

Kitchen Hacks : घरात आणलेलं जिरं अस्सल आहे की नकली? FSSAIने सांगितली भेसळ ओळखण्याची पद्धत

Last Updated:

How to identify cumin adulteration : काहीजण वजन कमी करण्यासाठी रोज पहाटे जिरे घातलेले पाणी पितात. मात्र जे जिरं अस्सल आहे की नकली हे तुम्हाला ओळखता येतं का? नसेल, तर चला त्याची योग्य पद्धत जाणून घेऊया.

जिऱ्यात कशाची भेसळ केली जाते?
जिऱ्यात कशाची भेसळ केली जाते?
मुंबई : जिऱ्याचा वापर बहुतांश मसालेदार पदार्थांमध्ये केला जातो आणि संपूर्ण भारतात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. बऱ्याच लोकांना जिरा राईस खायला फार आवडतो. तर काहीजण वजन कमी करण्यासाठी रोज पहाटे जिरे घातलेले पाणी पितात. मात्र जे जिरं अस्सल आहे की नकली हे तुम्हाला ओळखता येतं का? नसेल, तर चला त्याची एक योग्य पद्धत जाणून घेऊया.
बाजारात जिरे खूप महाग असल्याने त्यात नफा मिळवण्यासाठी भेसळ केली जाते. तुमच्या स्वयंपाकघरातही भेसळयुक्त किंवा नकली जिरे वापरले जात नाही ना, जे आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान करू शकते? चला जाणून घेऊया भेसळयुक्त जिरे कसे ओळखायचे.
युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरनुसार जिऱ्यामध्ये प्रथिने, विविध कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बीटा-कॅरोटीन, ल्यूटीन-झेक्सॅन्थिन, व्हिटॅमिन सी आणि फॅटी अ‍ॅसिड्स असतात. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सकाळच्या दिनचर्येत जिरे पाण्याचा समावेश करतात, कारण ते डिटॉक्स म्हणून काम करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. सध्या आपण भेसळयुक्त जिरे कसे ओळखायचे ते पाहूया.
advertisement
जिऱ्यात कशाची भेसळ केली जाते?
जिऱ्यामध्ये प्रामुख्याने गवताच्या बियांची भेसळ केली जाते आणि ती जिऱ्याच्याच किमतीत विकली जाते. हे मुळात नकली जिरे असते. याशिवाय वजन आणि रंग वाढवण्यासाठी कोळशाच्या धुळीसारखे पदार्थ मिसळले जातात. हे सर्व पदार्थ आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे पचनसंस्थेचे नुकसान होऊ शकते, यकृतावर परिणाम होऊ शकतो आणि अ‍ॅलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. मसाल्यांसाठी FSSAIने ठरवलेल्या निकषांनुसार कोणतेही इतर पदार्थ किंवा रंग मिसळण्यास परवानगी नाही.
advertisement
पाण्यात टाकून तपासा
जिऱ्यात भेसळ आहे की नाही हे तपासण्याची एक सोपी पद्धत म्हणजे एक काचेचा ग्लास घेऊन त्यात एक चमचा जिरे टाका. यामुळे त्यात रंग किंवा धूळ आहे की नाही हे कळते. धूळ पाणी गढूळ करू शकते आणि भेसळ असल्यास ते लगेच विरघळते. मात्र अस्सल जिरे रंगहीन राहते. संपूर्ण रात्र पाण्यात भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच पाण्यात हलका रंग दिसतो. याउलट नकली जिरे लगेच रंग सोडू लागते.
advertisement
वास घेऊन तपासा
गरम मसाल्यापासून फोडणीपर्यंत प्रत्येक पदार्थात जिऱ्याचा वापर होतो. कारण त्याला खास सुगंध असतो. त्यामुळे भेसळ ओळखण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे त्याचा वास घेणे. जर काही विचित्र किंवा रासायनिक वास येत असेल तर ते कृत्रिम रंगांनी भेसळ केलेले असू शकते.
हाताच्या तळव्यावर चोळून पाहा
थोडेसे जिरे घेऊन ते आपल्या हाताच्या तळव्यावर घट्ट चोळा. जर ते भेसळयुक्त नसेल तर हात स्वच्छ राहील. पण जर त्यात गवताच्या बिया असतील, तर त्या हातावर रंग सोडतील. या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जिऱ्यात भेसळ आहे की नाही हे ओळखू शकता.
advertisement
जिऱ्याचे अनेक फायदे
हेल्थलाईननुसार, जिरे पचनक्रियेला मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य टिकवून ठेवते. तसेच आयर्नचा चांगला स्रोत असल्यामुळे ते हिमोग्लोबिन निर्मितीस मदत करते. नव्या मातांसाठी जिरे अत्यंत फायदेशीर मानले जाते आणि वजन व चरबी कमी करण्यासह अनेक आरोग्यविषयक फायदे देते.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : घरात आणलेलं जिरं अस्सल आहे की नकली? FSSAIने सांगितली भेसळ ओळखण्याची पद्धत
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement