Sagar Karande : 'इंडस्ट्रीतल्या मित्रांनी माझ्याविरोधात कारस्थानं केली', सागर कारंडेचा शॉकिंग खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता सागर कारंडे सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे. इंडस्ट्रीतल्या मित्रांनी माझ्या विरोधात कारस्थानं केल्याचं सागरनं पहिल्यांदाच सांगितलं.
मराठी नाटक, मालिका, सिनेमांतून प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता सागर कारंडे. चला हवा येऊ द्या या शोमधून सागर कारंडेला घराघरात ओळख मिळाली. सागर कारंडेनं त्याच्या अभिनायची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. सागर कारंडे सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे. दरम्यान सागर कारंडेची एक मुलाखत समोर आली आहे ज्यात त्यानं इंडस्ट्रीतील लोकांनी त्याच्या विरोधात कारस्थानं केल्याचा धक्कादायक खुलासा केला.
advertisement
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सागर कारंडेनं हा खुलासा केला. सागर कारंडे म्हणाला, "मी स्पष्ट बोलल्याचे मला तोटे झालेत. आपण एखाद्याला एक गोष्ट सांगितली की हे असं नको असं कर तर त्याला राग यायचा. कोणी असेल मग, दिग्दर्शक, लेखक, प्रोड्यूसर, आपण सांगणंच चुकीचं आहे असं वाटतं. पण मला ते पटत नाही, मला ते कुठेतरी खटकत."
advertisement
advertisement
advertisement
"समोरच्याला वाईट वाटेल. मग याचा असाही समज होतो की, याचं काही नाही हा बोलत नाही काय नाही त्याला आपण व्यवस्थित फसवू शकतो. त्याच्याबरोबर राजकारण करू शकतो, असंही काही लोकांना वाटतं. त्यांना बोललं तर प्रॉब्लेम आणि नाही बोललं तरी प्रॉब्लेम आहे. हा काही करूच शकत नाही, आपण याला बरोबर जाळ्यात अडकवू शकतो. लोक आपल्याला गृहीत धरतात."
advertisement
advertisement
advertisement
advertisement








