Indian Post Recruitment: ना परीक्षा, ना मुलाखत; थेट केंद्र शासनाची नोकरी! पोस्टात 'या' पदांसाठी निघाली भरती
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
जर तुम्ही ग्रॅज्युएट आहेत, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या पोस्ट विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट खात्यामार्फत ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
जर तुम्ही ग्रॅज्युएट आहेत आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकांचे केंद्र सरकारच्या पोस्ट विभागामध्ये नोकरी करणे हे स्वप्न असते. आता हे स्वप्न सत्यात उतरणार आहे. अनेक तरुण मंडळी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या पदाची आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतात. परंतु, अनेकांना नोकरीच्या मुलाखतीची भीती वाटते. त्यामुळे काही जण चांगल्या संधी असूनही अर्ज करण्यापासून मागे हटतात. अशा तरुणांसाठी केंद्र सरकारने एक मोठी आणि दिलासादायक संधी उपलब्ध करून दिली आहे. या भरतीसाठी ना मुलाखत आहे, ना उच्च शिक्षणाची अट आहे.
भारतीय पोस्ट खात्यामार्फत ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही भरती प्रक्रिया सुरू झाली असून देशभरात २५ हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पोस्ट ऑफिसने काही दिवसांपूर्वीच या भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. फक्त 10 वीच्या आधारावरच ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे देशातल्या अनेक तरूणांना या भरती प्रक्रियेमध्ये नोकरीसाठी ट्राय करता येणार आहे.
advertisement
ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठीच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2026 पासून सुरू झाली असून 4 फेब्रुवारी 2026 ही तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट 10 वीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्टद्वारे केली जाईल. यामध्ये विशेषतः गणित विषयातील गुणांना महत्त्व दिले जाणार आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क भरण्याची अंतिम तारीख 5 फेब्रुवारी २०२६ रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट 20 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार दरमहा सुमारे 10,000 ते 29,480 रुपये इतके वेतन मिळणार आहे. त्यामुळे कोणतीही मुलाखत न देता सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 3:08 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Indian Post Recruitment: ना परीक्षा, ना मुलाखत; थेट केंद्र शासनाची नोकरी! पोस्टात 'या' पदांसाठी निघाली भरती





