Pune Grand Tour : भाई कितने की है...? रायडरच्या सायकलची किंमत ऐकून पोलिस अधिकारीही झाला थक्क, Video एकदा पाहाच
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Grand Tour police Inspector Video : सायकल कितीची आहे? असा सवाल पोलीस अधिकारी त्या रायडरला विचारतात. तेव्हा ही सायकल एक लाख सत्तर हजाराची असल्याचं रायडरने असल्याचं सांगितलं.
Pune Grand Tour 2026 : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात सायकल ग्रँड टूरची जोरदार चर्चा सुरू असून, स्पर्धक मोठ्या उत्साहात या टूरमध्ये सहभागी होताना दिसली. आरोग्य, फिटनेस आणि साहस यांचा संगम असलेल्या या स्पर्धेमुळे सायकलिंगकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत चालला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या सायकलींचे प्रकार, त्यांची तंत्रज्ञानाधारित रचना आणि किंमत याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलीस अधिकाऱ्याचा प्रश्न
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारी थांबलेल्या रायडरजवळ जातात अन् आपुलकीने एक प्रश्न विचारतात. ही सायकल कितीची आहे? असा सवाल पोलीस अधिकारी त्या रायडरला विचारतात. तेव्हा ही सायकल एक लाख सत्तर हजाराची असल्याचं रायडरने असल्याचं सांगितलं. त्यावेळी ही चार्जिंगची आहे का? असंही त्यांनी विचारलं. तेव्हा ही चार्जिंगची नाही तर पॅडलवाली आहे, असंही रायडरने उत्तर दिलं. ही रेसची बाईक आहे. ही फक्त प्लेन रोडवर चालते. खड्ड्यात याला चालवता येत नाही, असं रायडरने सांगितलं.
advertisement
advertisement
सायकलीचे प्रकार कोणते?
सायकलींच्या मुख्य प्रकारांमध्ये सिटी बाईक, माउंटन स्टेरिंग बाईक आणि रोड बाईक यांचा समावेश होतो. सिटी बाईक या शहरातील सामान्य रस्त्यांवर चालवण्यासाठी असतात. माउंटन स्टेरिंग बाईक या रस्त्यावर तसेच ऑफ-रोड वापरासाठी योग्य असतात. तर रोड बाईक या विशेषतः रेसिंग आणि स्पर्धांसाठी वापरल्या जातात. सध्या सुरू असलेल्या सायकल ग्रँड टूर स्पर्धेमध्ये प्रामुख्याने रोड बाईक रेसिंग प्रकारातील सायकली वापरल्या गेल्या.
advertisement
सायकलीच्या किमती किती?
दरम्यान, या सायकली बेसिक मॉडेलपासून ते प्रीमियम श्रेणीपर्यंत असतात. या सायकलींचे फ्रेम्स प्रामुख्याने कार्बनचे असल्यामुळे त्या अत्यंत हलक्या वजनाच्या असतात. लांब पल्ल्याच्या प्रवासात चढ-उतार सहज पार करता यावेत यासाठी 21, 24 किंवा 27 गिअर असलेल्या सायकली वापरल्या जातात. रेसिंग आणि लॉंग रूटसाठी वापरल्या जाणाऱ्या सायकलींचे वजन साधारण 3 ते 4 किलोपर्यंत असते, तर कार्बन हँडल आणि फ्रेम असलेल्या सायकलींचे वजन 2 ते 3 किलोपर्यंत कमी होते. यामुळेच या सायकलींची किंमतही वाढते, अशा प्रीमियम सायकलींची किंमत काही वेळा 20 लाख रुपयांपर्यंत जाते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 2:30 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Grand Tour : भाई कितने की है...? रायडरच्या सायकलची किंमत ऐकून पोलिस अधिकारीही झाला थक्क, Video एकदा पाहाच








