advertisement

रात्रभर तपास अन् सकाळी ट्रॅप, प्राध्यापक अलोक यांच्या मारेकऱ्याला कसं पकडलं? पोलिसांनी सांगितली Inside Story

Last Updated:

मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात एका प्राध्यापकाची निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं? याची अपडेट समोर आली आहे.

News18
News18
मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात एका प्राध्यापकाची निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शनिवारी सायंकाळी लोकल ट्रेनमधून प्रवास करताना झालेल्या किरकोळ कारणातून ओंकार शिंदे नावाच्या तरुणाने प्राध्यापक अलोक कुमार सिंह यांची निर्घृण हत्या केली. आरोपीनं टोकदार शस्त्राने वार करून अलोक यांना संपवलं. हत्या केल्यानंतर तो गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता. मात्र पोलिसांनी अवघ्या १२ तासात त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी रात्रभर तपास करत सकाळी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला अटक कशी केली, याचा खुलासा पोलिसांनीच केला आहे.

पोलिसांनी असा लावला छडा

हत्येची घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाला होता. बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासासाठी विशेष पथके तैनात केली. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तपासात असे दिसून आले की, आरोपी नियमितपणे मालाड ते चर्नी रोड असा प्रवास करतो. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी मालाड स्थानकावर सापळा रचला आणि आज सकाळी आरोपीला ताब्यात घेतले.
advertisement

नेमकी घटना आणि हत्येचे कारण

मृत आलोक कुमार सिंग (३१) हे कांदिवलीचे रहिवासी असून विलेपार्ले येथील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. शनिवार, २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास ते चर्चगेट-बोरिवली लोकलने प्रवास करत होते. मालाड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर गाडी आली असता, डब्यातून उतरताना त्यांचा एका तरुणाशी धक्का लागल्यावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या तरुणाने आपल्या जवळील तीक्ष्ण हत्याराने आलोक सिंग यांच्या पोटात वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिंग यांना तातडीने शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
advertisement
आरोपीने गुन्ह्यासाठी वापरलेले धारदार शस्त्र पळून जाताना कुठेतरी फेकून दिले आहे. पोलीस आता ते शस्त्र जप्त करण्यासाठी आरोपीची सखोल चौकशी करत आहेत. आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार असून, पोलीस त्याची कोठडी मागणार आहेत. प्राथमिक चौकशीत हा प्रकार रागाच्या भरात घडल्याचे दिसत असले तरी, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
रात्रभर तपास अन् सकाळी ट्रॅप, प्राध्यापक अलोक यांच्या मारेकऱ्याला कसं पकडलं? पोलिसांनी सांगितली Inside Story
Next Article
advertisement
Sanjay Raut On Cancer: "पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहिल्यांदाच केला खुलासा!
"पाणी पिणंही कठीण झालं होतं..."; संजय राऊतांचा मृत्यूशी झुंज देणारा तो थरार, पहि
  • ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मागील वर्षी गंभीर आजाराने ग्रासले होते.

  • संजय राऊत यांनी आपल्या आजाराबाबत सविस्तर भाष्य केले आहे.

  • दिवाळीच्या काही दिवस आधीच आपल्याला कॅन्सर झाल्याचे राऊत यांनी सांगितले

View All
advertisement