संयम बाळगला आता फळ मिळणार! बुधाचा नवपंचम योग, १७ फेब्रुवारीपासून या राशींचे श्रीमंती दरवाजे खुले होणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संयोगांना विशेष महत्त्व दिले जाते. ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा परिणाम केवळ व्यक्तीच्या जीवनावरच नाही, तर सामाजिक आणि आर्थिक घडामोडींवरही होताना दिसतो.
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या संयोगांना विशेष महत्त्व दिले जाते. ग्रहांची स्थिती बदलली की त्याचा परिणाम केवळ व्यक्तीच्या जीवनावरच नाही, तर सामाजिक आणि आर्थिक घडामोडींवरही होताना दिसतो. विशेषतः जेव्हा दोन शुभ ग्रह परस्पर अनुकूल कोनात येतात, तेव्हा त्यातून निर्माण होणारे योग प्रगती, समृद्धी आणि यशाचे संकेत देतात. नव्या वर्षात असाच एक दुर्मीळ आणि प्रभावी योग तयार होत असून, त्याला नवपंचम राजयोग असे म्हटले जाते.
नवपंचम राजयोग कधी आणि कसा तयार होणार?
ज्योतिषशास्त्रानुसार, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे २ वाजून ५९ मिनिटांनी देवगुरू बृहस्पती आणि बुध ग्रह एकमेकांपासून १२० अंशांच्या अंतरावर येतील. या कोनात्मक स्थितीमुळे नवपंचम राजयोगाची निर्मिती होणार आहे. यावेळी बृहस्पती ग्रह मिथुन राशीत विराजमान असेल, तर बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. विशेष बाब म्हणजे कुंभ राशीत बुध ग्रहाची युती सूर्य, शुक्र आणि राहू यांच्याशी होणार असल्याने या योगाची प्रभावीता अधिक वाढणार आहे. त्यामुळे काही राशींना हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे.
advertisement
मीन रास
मीन राशीच्या जातकांसाठी नवपंचम राजयोग प्रगतीचे नवे मार्ग खुले करणारा ठरेल. या काळात बृहस्पती चतुर्थ भावात प्रभाव टाकत असून बुध ग्रह खर्च आणि परदेशाशी संबंधित भावांवर परिणाम करेल. त्यामुळे परदेश प्रवास, आयात-निर्यात किंवा आंतरराष्ट्रीय व्यवहाराशी संबंधित संधी मिळू शकतात. सुरुवातीला खर्च वाढल्याचे जाणवेल, मात्र दीर्घकालीन दृष्टीने त्यातून चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रवास घडू शकतो. संयम ठेवल्यास हा काळ भविष्यासाठी फायदेशीर ठरेल.
advertisement
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी हा राजयोग करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक क्षमता वाढल्यामुळे निर्णयक्षमता मजबूत होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायी असून अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. मुलांच्या कला आणि कौशल्यांना योग्य दिशा मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल आणि कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील.
advertisement
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग अत्यंत शुभ मानला जात आहे. बुध ग्रहाचा प्रभाव वाढल्याने वाणी, बुद्धिमत्ता आणि विचारशक्ती अधिक तीव्र होईल. तुमच्या बोलण्यामुळे आणि निर्णयक्षमतेमुळे लोक प्रभावित होतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत असून गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल आणि कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल जाणवतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 2:03 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
संयम बाळगला आता फळ मिळणार! बुधाचा नवपंचम योग, १७ फेब्रुवारीपासून या राशींचे श्रीमंती दरवाजे खुले होणार










