धनश्री, आरजे महवशनंतर आता युझवेंद्र चहल 'बिग बॉस' कंटेस्टंटच्या प्रेमात? एकत्र झाले स्पॉट, कोण आहे ती?
- Published by:Priya Lad
Last Updated:
युझवेंद्र चहलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात तो एका रेस्टॉरंटबाहेर दिसला. त्याने चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्क लावला होता. पण तो एकटा नव्हता तर त्याच्यासोबत एक महिला होती.
भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आधी धनश्री वर्मासोबत घटस्फोट, नंतर आरजे महवशसोबत अफेअर्स आणि आता त्याचं नाव एका नव्या महिलेसोबत जोडलं गेलं आहे. ती बिग बॉसची कंटेस्टंट आहे, जिच्यासोबत चहलचं आता अफेअर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यांचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
कोरिओग्राफर धनश्री वर्माशी घटस्फोटानंतर युझवेंद्र चहल आरजे महवशसोबत दिसला. दोघंही अनेक ठिकाणी एकत्र दिसले. त्यामुळे ते एकमेकांना डेट करत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण दोघांनीही कधीच याबाबत अधिकृतपणे सांगितलं नाही. या चर्चांदरम्यान याचदरम्यान महवश आणि चहल दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं. त्यांच्यात नेमकं काय बिनसलं असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतानाच चहलच्या आयुष्यात आता तिसरीच महिला दिसली आहे, जी बिग बॉसच्या कंटेस्टंट आहे.
advertisement
Palash Smriti : स्मृती मानधनाच्या मित्राने बेडरूम कांड समोर आणल्यानंतर पलाश मुच्छलनं उचललं मोठं पाऊल
युझवेंद्र चहलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात तो एका रेस्टॉरंटबाहेर दिसला. त्याने ब्लॅक शर्ट आणि फेड ब्लू जीन्स घातली होती आणि चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्क लावला होता. पण तो एकटा नव्हता तर त्याच्यासोबत एक महिला होती. ही महिला दुसरी तिसरी कुणी नाही तर बिग बॉसची कंटेस्टंट शेफाली बग्गा. जी बिग बॉसच्या तेराव्या सीझनची कंटेस्टंट आहे.
advertisement
advertisement
महवशने अनफॉलो केल्यानंतर युझवेंद्र आणि शेफालीला एकत्र पाहून आता यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. व्हिडीओतही तुम्ही पाहू शकता मीडिया समोर दिसताच चहलचे डोळे थोडे बिथरलेले दिसतात. त्याचं लक्ष शेफालीकडे जातं. सुरुवातीला चहल चेहऱ्यावरील मास्कही काढत नाही. पापाराझी त्याला मास्क काढायला लावतात. कॅमेरा शेफालीकडे जातो. ती स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न करते पण कॅमेऱ्यापासून ती लपू शकत नाही. कशीबशी ती कॅमेऱ्याला सामोरी जाते.
advertisement
चहल आणि शेफाली एकत्र दिसले तरी कॅमेऱ्यासमोर ते एकमेकांच्या जवळ आले आहे, दूरच राहिले. त्यांनी एकत्र पोझही दिली नाही. मास्क काढल्यानंतर तर चहल क्षणभरही तिथं थांबत नाही, तिथून लगेच बाजूला झाला. त्यानंतर शेफाली पुढे आली.
Location :
Delhi
First Published :
Jan 25, 2026 2:00 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
धनश्री, आरजे महवशनंतर आता युझवेंद्र चहल 'बिग बॉस' कंटेस्टंटच्या प्रेमात? एकत्र झाले स्पॉट, कोण आहे ती?








