Mayor Election: अडीच वर्ष महापौर पद नाहीतर..., ठाकरे गटाच्या अटीने खळबळ, 'मातोश्री'वर हालचालींना वेग, महापौरपदाचं आज ठरणार?
- Reported by:susmita Bhadane patil
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Chandrapur Mayor Election: चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने सत्तास्थापनेचा सस्पेन्स आता टोकाला पोहोचला आहे.
मुंबई: चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्याने सत्तास्थापनेचा सस्पेन्स आता टोकाला पोहोचला आहे. महापालिकेत २७ जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमताचा ३४ हा आकडा गाठण्यासाठी त्यांना अद्याप ७ नगरसेवकांची गरज आहे. दुसरीकडे २३ जागा जिंकलेल्या भाजपला सत्ता मिळवण्यासाठी ११ नगरसेवकांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. या 'काँटे की टक्कर'मध्ये आता शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी 'किंगमेकर'च्या भूमिकेत आले आहेत. ठाकरे गट आणि 'वंचित'च्या आघाडीने चंद्रपूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
ठाकरे गटाची मोठी अट, "अडीच वर्ष महापौर आमचाच!"
आज चंद्रपूरचे ठाकरे गटाचे नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवणार आहेत. तत्पूर्वी, ठाकरे गटाने आपली भूमिका आक्रमक केली आहे. "काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की, ताट समोर आहे पण खाता येत नाही. आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. मात्र, आमची अट स्पष्ट आहे. अडीच वर्ष महापौरपद आमचेच हवे, अन्यथा अडीच वर्ष उपमहापौर आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद आम्हाला मिळाले पाहिजे, असे ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
advertisement
भाजपसोबत जाणार की काँग्रेसला साथ?
ठाकरे गटाने भाजपसोबत जाण्याचे दरवाजेही पूर्णपणे बंद केलेले नाहीत. "राजकारणात भविष्यात काहीही घडू शकतं," असे म्हणत त्यांनी भाजपसोबतच्या युतीचे संकेतही दिले आहेत. भाजपला सत्तेसाठी जास्त नगरसेवकांची गरज असली, तरी ठाकरे गटाला हवे असलेले महापौरपद भाजप देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
>> काय आहे चंद्रपूरचं पक्षीय बलाबल?
advertisement
> चंद्रपूर महापालिकेच्या ६६ जागांचे गणित आता अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे:
> काँग्रेस: २७
> भाजप: २३
> शिवसेना (UBT): ०६
> वंचित बहुजन आघाडी: ०२
> अपक्ष व इतर: ०८
शिवसेना ठाकरे गट (६) आणि वंचित (२) यांनी निवडणुकीआधीच युती केली होती. आता त्यांच्यासोबत २ अपक्ष नगरसेवकही आल्याने या १० जणांच्या गटाकडे सत्तेच्या चाव्या गेल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 1:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mayor Election: अडीच वर्ष महापौर पद नाहीतर..., ठाकरे गटाच्या अटीने खळबळ, 'मातोश्री'वर हालचालींना वेग, महापौरपदाचं आज ठरणार?










