Numerology: 'या' तारखांचा जन्म असणारे सर्वांना हवे-हवे वाटतात; कामातूनच आपला करिष्मा दाखवतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: निसर्गाची किमया आहे, कारण इथं प्रत्येक माणूस निराळा आहे. प्रत्येकाचे आचार-विचार भिन्न असतात, अंकशास्त्र ही एक अशी प्राचीन पद्धत आहे ज्यावर अनादी काळापासून विश्वास ठेवला जात आहे. या शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि त्याचे व्यक्तिमत्व हे त्याच्या जन्मतिथीवर अवलंबून असते. जन्मतिथीमधील अंकांची बेरीज करून जो एक अंकी क्रमांक मिळतो, त्याला मूलांक असे म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 25 तारखेला झाला असेल, तर 2 आणि 5 ची बेरीज 7 येते, जो त्या व्यक्तीचा मूलांक असतो.
मूलांक 1: नेतृत्व आणि बुद्धिमत्ता (जन्म तारीख 1, 10, 19, 28)ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला आहे, त्यांच्यामध्ये उपजत नेतृत्वाचे गुण असतात. हे लोक अत्यंत बुद्धिमान असतात आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतात. आपली प्रतिभा दाखवण्यात ते नेहमी आघाडीवर असतात. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढतो, म्हणूनच ते अनेकांचे लाडके आणि सन्माननीय व्यक्ती बनतात.
advertisement
मूलांक 3: (जन्म तारीख 3, 12, 21, 30)ज्यांचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 3 असतो. हे लोक सर्जनशीलतेने परिपूर्ण असतात. मनोरंजन करणे आणि प्रभावीपणे बोलणे ही त्यांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. ते कोणाशीही सहजपणे मिसळतात. अगदी कठीण प्रसंगातही आपल्या विनोदी शैलीने वातावरण आनंदी करून टाकतात, त्यामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.
advertisement
मूलांक 5: (जन्म तारीख 5, 14, 23) कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या लोकांना बदल स्वीकारायला आणि नवीन गोष्टी शिकायला खूप आवडते. स्वभावात थोडी खोडकर वृत्ती आणि विनोदी बोलणं ही त्यांची खासियत असते. ते जिथे कुठे जातात, तिथले वातावरण उत्साही बनवतात, ज्यामुळे लोक त्यांच्याशी मैत्री करायला उत्सुक असतात.
advertisement
advertisement
मूलांक 9: (जन्म तारीख 9, 18, 27) ज्या लोकांचा जन्म 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे, त्यांना इतरांचे दुःख लवकर समजते. ते आपल्या भाषणातून लोकांना हसवण्यात पटाईत असतात. स्वतः अडचणीत असतानाही ते हसतमुखाने त्यावर उपाय शोधून काढतात. या गुणामुळेच समाजात त्यांना खूप पसंती मिळते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







