मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध गायकाचं निधन, 4 महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
प्रसिद्ध गायकाचं निधन झालं. त्याच्या निधनाची माहिती समोर येताच चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीने श्रद्धांजली वाहिली.
मनोरंजन विश्वातून अत्यंत दु:ख बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायकाचं निधन झालं आहे.गायक अनेक दिवस आजारी होता. त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारांती गायकाचं निधन झालं. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी गायकानं या जगाचा निरोप घेतला.
आपण ज्या गायकाविषयी बोलत आहोत तो गायक म्हणजेच अभिजीत मजूमदार. हे उडियाचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक होते. रविवारी एक्स भुवनेश्वर येथे उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. अभिजीत मजूमदार हे गेल्या वर्षभरापासून आजारी होते. त्यांना 4 सप्टेंबर रोजी उच्च रक्तदाब, हायपोथायरॉईडीझम आणि किडन संबधीत जुन्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो ICU मध्ये होते. 10 नोव्हेंबर रोजी त्यांना मेडिसीन वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं.
advertisement
( मनोरंजन विश्वात खळबळ! 19 वर्षांची मुलगी, पहिल्या बायकोला डिवोर्स न देता अभिनेत्यानं केलं दुसरं लग्न )
23 जानेवारील त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालं. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र तब्येत सुधारणा झाली नाही. त्यांना गंभीर सेप्टिकही झालं होतं.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) भुवनेश्वर हॉस्पिटलमधून रविवारी सकाळी बुलेटिन काढण्यात आलं की, गायकाला सकाळी 7:43 मिनिटांनी हार्ट अटॅक आला. त्यांना सीपीआर देण्यात आला. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांची टीम शर्तीचे प्रयत्न करत होती पण सकाळी 9:02 मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
advertisement
अभिजीत मजूमदार यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास, उडिया फिल्म इंडस्ट्रीतील ते लोकप्रिय गायक, संगीतकार होते. उडियामध्ये त्यांच्या गाण्याची प्रचंड लोकप्रियता आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांचे चाहत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. इंडस्ट्री तसंच राजकीय क्षेत्रातील अनेक लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 3:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध गायकाचं निधन, 4 महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी









