पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, आर्मिडा फर्नांडिस आणि श्रीरंग लाड यांना पद्मश्री
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून देशातील 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च पुरस्कार मानले जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील अनेकांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये, लोकनाट्य क्षेत्रात तमाशा कलाकार रघुवीर खेडकर आणि कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड यांना यंदाच्या वर्षीचे पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यांसह पालघरमधील वारली संगीतकार भिकल्या लाडक्या ढिंका यांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने 45 मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली असून प्रजासत्ता दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व सन्मानितांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील 4 भूमीपुत्रांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यामध्ये, लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांचाही समावेश आहे. लोककला, लोकनाट्य जपण्यात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान होत आहे.
पद्मश्री पुरस्कार
- आर्मिडा फर्नांडिस (मुंबई) - आशियातील पहिला ब्लड बँक स्थापन करण्यासाठी मोलाचे योगदान
- अंके गौडा- भारतातील सर्वात मोठी ग्रंथालय उभारण्याच्या कार्यासाठी.
- भगवानदास रायकवार- बुंदेली वॉर आर्टचे प्रशिक्षक म्हणून पारंपरिक युद्धकलेचे जतन व प्रसार
- बृजलाल भट्ट (जम्मू-काश्मीर)- समाजसेवा व योगशिक्षणाच्या क्षेत्रातील योगदानासाठी
- बुदरी ठाडी (छत्तीसगड)-नक्षलग्रस्त भागात शिक्षण पोहोचवण्याच्या कार्यासाठी.
- चरण हेम्ब्राम (ओडिशा)- संथाली भाषेतील साहित्यनिर्मितीसाठी प्रसिद्ध लेखक.
- चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)- पितळकलेत (ब्रास आर्ट) लोकांना प्रशिक्षण देऊन पारंपरिक हस्तकलेचा विकास
- धार्मिक लाल चुन्नीलाल पांड्या- शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील योगदानासाठी
- डॉ. कुमारस्वामी थंगराज-जेनेटिक्स (आनुवंशिक संशोधन) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी
- डॉ. पद्मा गुरमीत (लडाख)- सोवा-रिग्पा या पारंपरिक वैद्यक पद्धतीच्या संवर्धनासाठी
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 3:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील रघुवीर खेडकर, आर्मिडा फर्नांडिस आणि श्रीरंग लाड यांना पद्मश्री





