प्रोबायोटिक्स
प्रोबायोटिक्स नैराश्यावर उपचार करण्यास मदत करू शकतात. आंबवून तयार केलेले पदार्थ प्रोबायोटिक्सने भरलेले असतात. जर तुम्हाला खूप भूक लागली असेल तर इडली, डोसा खाल्ल्याने पोटालाही आराम मिळेल आणि मूडही चांगला होईल. याशिवाय तुम्ही दही किंवा लस्सी सुद्धा पिऊ शकता.
advertisement
सुकामेवा
एखाद्या व्यक्तीचा मूड हा त्याच्या शरीरात असलेल्या सेरोटोनिन हार्मोन्सवर अवलंबून असतो. सुकामेव्यात असलेलं मूड ट्रिप्टोफेन नावाचं एक अमिनो ॲसिड असतं जे सेरोटोनिन वाढवण्यासाठी फायद्याचं असतं. त्यामुळे सुकामेवा खाल्ल्याने सेरोटोनिन वाढून मूड चांगला राहू शकतो. याशिवाय सुकामेवातून प्रोटिन्स, गुड फॅट आणि व्हिटॅमिन ई मिळतं
डार्क चॉकलेट
लहानांपासून मोठ्यांपर्यंत चॉकलेट सर्वांनाच आवडते. फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध असलेले डार्क चॉकलेट सेरोटोनिनची पातळी वाढवू शकते. ज्यामुळे नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल तर चॉकलेट खाणं तुम्ही टाळावं. लहान मुलांना चॉकलेटचे काही तुकडे घालून ओट्स दिलं तर ते फायद्याचं ठरू शकतं.
केळी
रक्तातील साखरेची पातळी चिडचिडेपणा आणि मूड बदलण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांनी केळी खावीत कारण केळ्यांमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन बी 6 असतं. जे डोपामाइन आणि सेरोटोनिन सारख्या फील-गुड न्यूरोट्रांसमीटरच्या उत्पादनास मदत करते. यामुळे रक्तात साखर हळूहळू विरघळते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहून मूड सुधारतो.
ओट्स
नाश्त्यात खाण्यासाठी चांगला पर्याय आहे. ओट्स हळूहळू ऊर्जा वाढवतात. हे साखरेची वाढ आणि घसरण रोखू शकते ज्यामुळे आपल्या मूडवर चांगला परिणाम होऊ शकतो.
पालक
पालकाच्या पानांमध्ये फोलेट, व्हिटॅमिन बी असतात. जे मूड-नियमन करणारे न्यूरोट्रान्समीटर, सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढविण्यास मदत करतात.