TRENDING:

Cancer : चुकीच्या सवयी देतात कर्करोगाला आमंत्रण, आहारतज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा, कर्करोगासंबंधी महत्त्वाची माहिती

Last Updated:

सकाळी उकळत्या चहाचे घोट घेणं किंवा शिळ्या तेलात शिजवलेलं अन्न खाणं यासारख्या तुमच्या काही साध्या दैनंदिन सवयी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. काहीवेळा या सवयींमुळे कर्करोगाचा धोका संभवतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतात आणि जगभरात कर्करोगाचं प्रमाण वेगानं वाढतंय. याला अनेक घटक कारणीभूत आहेत. अनेकदा आपल्या रोजच्या चुकीच्या सवयींमधूनही कर्करोगाची सुरुवात होऊ शकते.
News18
News18
advertisement

आहारतज्ज्ञ लिमा महाजन यांनी कर्करोगासंबंधित काही महत्त्वाची माहिती दिली आहे. यात त्यांनी तुमच्या आजूबाजूला असू शकणाऱ्या सात धोक्यांविषयी माहिती दिली आहे. सकाळी उकळत्या चहाचे घोट घेणं किंवा शिळ्या तेलात शिजवलेलं अन्न खाणं यासारख्या तुमच्या काही साध्या दैनंदिन सवयी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. काहीवेळा या सवयींमुळे कर्करोगाचा धोका संभवतो.

धूम्रपान - सिगरेट असो, व्हेप असो किंवा दुसऱ्यानं धूम्रपान केल्यानं होणारा धूर. थोड्या प्रमाणात धूम्रपान केल्यानंही फुफ्फुस आणि अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. म्हणून, ते पूर्णपणे टाळणं चांगलं.

advertisement

Skin Care : घरात तयार होऊ शकेल असा झटपट फेसपॅक, वाचा खास स्किन केअर टिप्स

मद्यपान - तज्ज्ञांच्या मते, अल्कोहोलच्या सेवनासाठी कोणतीही सुरक्षित मर्यादा नाही आणि अगदी कमी प्रमाणात देखील कर्करोगाचा धोका निर्माण करू शकतो. याव्यतिरिक्त, अल्कोहोलमुळे शरीरातील फोलेट आणि जीवनसत्त्वं अ, क, ड, ई या पोषक घटकांचं शोषण कमी होतं. हे सर्व घटक आपल्या शरीराचं संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचे असतात.

advertisement

गरम पेयं - खूप गरम चहा, कॉफी किंवा सूप पिण्याचे शौकीन असाल तर काळजी घ्या. वारंवार खूप गरम पेयं प्यायल्यानं अन्ननलिकेला नुकसान होऊ शकतं, ज्यामुळे अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

म्हणून, ही पेयं कोमट किंवा फक्त पिण्याइतकीच गरम प्यावीत असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

तांदूळ, गहू आणि शेंगदाण्यांना आलेली बुरशी - धान्य किंवा शेंगदाणे योग्यरित्या साठवले नाहीत तर त्यांच्यात अफलाटॉक्सिन तयार होऊ शकतात. बुरशीसारखे असतील तर ते अजिबात खाऊ नका. हे विषारी पदार्थ थेट यकृताच्या डीएनएला नुकसान करतात आणि यकृताचा कर्करोग होऊ शकतो.

advertisement

जळलेलं तंदुरी अन्न - काळे झालेले तंदुरी किंवा ग्रील्ड फूड खाणं टाळा. याचे जळलेले किंवा काळे झालेले भाग काढून टाकण्याची आणि धोका कमी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसंच आहारात सॅलड आणि भाज्यांचा समावेश करण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली आहे.

Papaya : पपईला अमृतफळ का म्हणतात ? जाणून घ्या पपईच्या घटकांचं महत्त्व

advertisement

तेल वारंवार गरम करणं - स्वयंपाकाचं तेल पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. तेल दोन-तीन वेळापेक्षा जास्त गरम करू नका. तेल काळं, जाड दिसत असेल किंवा त्यातून धुराचे झाले तर ते ताबडतोब टाकून द्या. तेल वारंवार गरम केल्यानं त्यात विषारी संयुगं तयार होतात, यामुळे कालांतरानं डीएनएला नुकसान होऊ शकतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

लाल मांस - लाल मांस खाण्याचं प्रमाण मर्यादित ठेवा. आठवड्यातून 350 ते 500 ग्रॅमपेक्षा जास्त शिजवलेलं मांस खाणं सुरक्षित नाही. यापेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्यानं आणि विशेषतः ते खूप जास्त आचेवर शिजवल्यानं कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer : चुकीच्या सवयी देतात कर्करोगाला आमंत्रण, आहारतज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा, कर्करोगासंबंधी महत्त्वाची माहिती
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल