Skin Care : चेहरा दिसेल फ्रेश फ्रेश, चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी साधे आणि पटकन होणारे उपाय
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चेहरा अनेकदा कोरडा दिसतो. यासाठी, कुठलंही रासायनिक उत्पादन न वापरता घरी अगदी कमी वेळात फेसपॅक तयार करता येऊ शकतो. यासाठी केळं, साय आणि मध इतकंच साहित्य आवश्यक आहे.
मुंबई : ऋतू बदलतो तेव्हा शरीरात खास करुन त्वचेवर त्याचा परिणाम सर्वात आधी जाणवतो. चेहरा अनेकदा कोरडा दिसतो. यासाठी, कुठलंही रासायनिक उत्पादन न वापरता घरी अगदी कमी वेळात फेसपॅक तयार करता येऊ शकतो.
आठवड्यातून दोनदाही हा फेसपॅक लावला तर चेहरा फ्रेश दिसेल. हा फेसपॅक बनवणं अगदी सोपं आहे, हा नैसर्गिक फेसपॅक घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून तयार करता येतो. यासाठी केळी आणि दुधाची साय या गोष्टी आवश्यक आहेत.
केळी आणि क्रीम फेस पॅक - केळी आणि क्रीम फेस पॅकमुळे चेहऱ्यावरची चमक परत येईल. साय त्वचेसाठी फायदेशीर आहे. कोरडी त्वचा असलेल्यांनी नियमितपणे साय लावावी.
advertisement
केळ्यात व्हिटॅमिन ए, बी आणि ई भरपूर प्रमाणात असतं. हे सर्व पोषक घटक त्वचेला पोषण देतात. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानं सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं.
हा फेसपॅक बनवण्यासाठी, पिकलेलं अर्धे केळं, एक टेबलस्पून साय, अर्धा टीस्पून मध हे साहित्य तयार ठेवा.
advertisement
फेसपॅक बनवण्याची पद्धत: पिकलेलं अर्धे केळं घ्या. ते चमच्यानं कुस्करा. त्यात साय आणि मध घाला आणि चांगलं मिसळा. चांगलं ढवळून घ्या आणि चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिटं चेहऱ्यावर सुकू द्या. नंतर कोमट पाण्यानं धुवा. नंतर थोडं मॉइश्चरायझर लावा.
advertisement
हा फेस पॅक आठवड्यातून दोनदा लावता येतो. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर फेस पॅक लावा. याचे चांगले परिणाम दिसावेत यासाठी हे मिश्रण झोपण्यापूर्वी लावणं चांगलं ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 7:00 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : चेहरा दिसेल फ्रेश फ्रेश, चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी साधे आणि पटकन होणारे उपाय










