त्वचेची काळजी घेण्याच्या पाच प्रभावी पद्धती
पहिली पद्धत
क्लिन्झर मिल्कने चेहरा सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छ करा. असे केल्याने चेहऱ्यावरील धूळ निघून जाईल आणि त्वचेला आराम मिळेल. यानंतर चेहऱ्यावर टोनर लावा, ज्यामुळे त्वचेवरील उघडलेली छिद्र मिटतील.
दुसरी पद्धत
या दोन गोष्टी केल्यावर तुम्ही तुमच्या स्किन टाइपनुसार चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. हे तुमच्या त्वचेला मऊ ठेवते व मॉइश्चर करते. तसेच तुम्ही ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेलही लावू शकता. मात्र जर तुमची त्वचा संवेदनशील आणि तेलकट असेल तर तेल लावू नका.
advertisement
तिसरी पद्धत
स्किन रूटीनमधील एक महत्त्वाचा भाग सनस्क्रीन आहे, त्यामुळे सनस्क्रीन लावायला विसरू नका. सनस्क्रीन तुमच्या त्वचेला घातक यूव्ही किरणांपासून सुरक्षित ठेवते. वातावरण कसेही असेल तरी दिवसा एसपीएफ सनस्क्रीन वापरा. यामुळे त्वचेवर डाग निघून जातील, तसेच सुरकुत्या कमी होतील.
चौथी पद्धत
त्वचेचं सौंदर्य बाह्य आरोग्यासोबतच अंतर्गत आरोग्यावरही अवलंबून असते. त्यामुळे पौष्टिक आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. फक्त वेगवेगळी उत्पादनं लावल्याने स्किन केअर रूटीन पूर्ण होत नाही, त्यासाठी चांगला आहारही महत्त्वाचा आहे. आपल्या आहारात व्हिटॅमिन सी आणि ई असलेल्या फळं आणि भाज्यांचे सेवन करा. हे अँटिऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
पाचवी पद्धत
स्किन केअर रूटीनमधील शेवटचा टप्पा एक्सफोलिएटिंग आहे. आठवड्यातून 1-2 वेळा एक्सफोलिएटर वापरा, ते त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करेल. तुम्ही आतापासून या स्किन केअर रूटीनच्या पद्धतींचा वापर केला तर तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेतली जाईल.
