भात खाण्याचे काय फायदे आहेत?
- तांदूळ हे प्रीबायोटिक आहे. भातामुळे केवळ तुमचं पोट भरत नाही, तर शरीरातल्या मायक्रोब्जच्या इकोसिस्टीमचीदेखील काळजी घेतली जाते.
- शरीरातले कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन बीची कमतरता पूर्ण करण्यासाठी तांदूळ खूप उपयुक्त आहेत. कांजीपासून ते खिरीपर्यंतचे विविध प्रकारचे पदार्थ तांदळापासून बनवता येतात.
- कढी, दही, डाळी, शेंगा, तूप आणि मांसासोबत भात खाल्ल्याने ब्लड शुगर रिस्पॉन्स स्टेबल होतो. म्हणजेच डायबेटीसचे रुग्ण भात यासोबत खाऊ शकतात. भात आणि मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये कोणताही संबंध नाही.
advertisement
- तांदळापासून भात बनवणं खूप सोपं आहे. इतकंच नाही तर हे लाइट डिनर फूड आहे. हे खाल्ल्यानंतर झोप लवकर येते.
- तांदूळ त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. केस वाढण्यासही मदत होते.
- भात हे सहज पचणारं अन्न आहे. डायरिया आणि अपचन झाल्यास भात खाल्ल्याने पोटाला खूप आराम मिळतो. जुलाब झाल्यास भात गायीच्या दुधासोबत किंवा दह्यासोबत खावा. त्याचा चांगला उपयोग होतो.
- भातात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. ते आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. त्याचबरोबर भाताचं सेवन केल्यास थकवा दूर होतो. पांढरा भात खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर होतात.
- पांढरा भात खाल्ल्याने अपचन, ॲसिडिटीची समस्या होत नाही. पांढरा भातात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. पोट बराच काळ भरलेलं राहतं.
