अशी बनवा शेवग्याच्या पानांची पावडर :
शेवग्याच्या पानांची पावडर तयार करण्यासाठी सर्वप्रथम झाडाची एक फांदी कापून घ्या. मग ही फांदी एका कापडावर लटकवून ठेवा. आता ही पाने सुकवण्यासाठी सर्वप्रथम त्यावरील घाण स्वच्छ करा. ही पाने सुकवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करा आणि मग गाळून घ्या. तयार झालेली शेवग्याच्या पानांची पावडर पाण्यात मिसळून प्या.
advertisement
Kids Eye Slight : मुलांना लहान वयातच चष्मा लागलाय? हे 5 सुपर फूड्स द्या, नंबर लगेच होईल कमी
शरीराला मिळते ऊर्जा :
जेव्हा थकवा आणि शरीरात अजिबात ताण नाही असे वाटेल अशावेळी शेवग्याच्या पानांची ही पावडर खाल्ल्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळू शकते. यात मॅग्नेशियम आणि आयरनची मात्रा जास्त असलयाने लगेचच थकवा आणि अशक्तपणा कमी होतो.
टॉक्सिन बाहेर काढते :
शेवग्याच्या पानांची पावडर शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी मदत करते. यापावडरमध्ये असणारे एंटी-ऑक्सीडेंट्स फ्री रेडिकल्ससोबत लढतात आणि शरीराला आतून साफ करण्यास उपयोगी ठरतात.
वजन कमी होते :
शेवग्याच्या पानांची पावडर खाल्ल्यामुळे लवकर भूक लागत नाही, त्यामुळे लोक प्रमाणातच जेवण करतात. मेटाबॉलिज्मला दुरुस्त करण्याचे देखील काम करते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पचनक्रिया चांगली होते :
शेवग्याच्या पानांच्या पावडरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते, त्यामुळे पचनक्रिया उत्तम होते. यामुळे खास करून कब्जच्या समस्येपासून सुटका मिळते.
तसेच यातील एंटी-इंफ्लेमेटरी गुण पोटातील इंफेक्शन दूर करण्यासाठी मदत करतात.
