चष्म्याची व्हिजिबिलिटी कमी होते आणि तसा चष्मा वापरल्याने डोळे आणि डोकं दुखू शकते. हेल्थलाइनच्या मते, जर तुम्ही 20 सेकंदांपेक्षा जास्त काळ कोणत्याही चष्म्याच्या काचा साफ केल्या तर त्या खराब होऊ शकतात. त्यामुळे, चष्मा साफ करण्याची योग्य पद्धत कोणती, ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे.
या गोष्टींनी चष्मा करा स्वच्छ
- मायक्रोफायबर कापड
advertisement
- क्लिनिंग सोल्यूशन
'या' पाच सवयी अंगिकारा, शरीरातील खराब कोलेस्टेरॉलपासून सुटका मिळवा
चष्मा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
-सर्वात आधी तुमचे हात चांगले धुवा जेणेकरून तुमच्या हातातील जंतू तुमच्या चष्म्यापर्यंत पोहोचणार नाहीत.
-आता कोमट पाण्याने चष्मा धुवा. जर तुमच्या भागात खारट पाणी येत असेल तर तुम्ही तो डिस्टिल्ड वॉटरच्या मदतीने स्वच्छ करा.
- आता तुमचा चष्मा मायक्रो फायबर कपड्याने पुसून टाका. आता काचांच्या आत आणि बाहेर क्लिनिंग सोल्यूशन शिंपडा. तुम्ही डिश वॉश साबण वापरत असाल तर तो पाण्यात विरघळवून चष्म्यावर लावा.
- आता अतिरिक्त पाणी पूर्णपणे पुसून घ्या आणि चष्मा कोरडा करा.
फ्रेम अशा प्रकारे स्वच्छ करा
फ्रेम कोमट पाण्याने धुवा आणि माइल्ड व लोशन फ्री साबणाने पूर्णपणे स्वच्छ करा. नोज पॅड काळजीपूर्वक स्वच्छ करा. आता नळाखाली पाण्यात धुवून घ्या. नोज पॅड आणि इअर पीस स्वच्छ करण्यासाठी, त्यांना अल्कोहोल लावलेल्या टॉवेलने पुसून स्वच्छ करा.
या चुका टाळा
-पेपर टिश्यू, पेपर टॉवेल यांसारख्या वस्तूंनी चष्म्याच्या काचा कधीही घासू नका.
-नेलपॉलिश रिमूव्हरसारख्या वस्तू काचेवर लावू नका.
- लाळ किंवा थुंकीच्या मदतीने चष्मा कधीही स्वच्छ करू नका.
