गर्भनिरोधक गोळ्या आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका
हार्मोनल संबंध
गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन्स असतात. हे हार्मोन्स शरीरातील नैसर्गिक हार्मोनल सायकलवर परिणाम करतात. काही स्तन कर्करोग हार्मोन्समुळे वाढतात, त्यामुळे या गोळ्यांमधील अतिरिक्त हार्मोन्स कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला चालना देऊ शकतात.
जोखीम कमी पण खरी
अभ्यासानुसार, या गोळ्यांमुळे स्तन कर्करोगाचा धोका फार मोठ्या प्रमाणात वाढत नाही, पण धोका नक्कीच असतो. संशोधनात असे आढळले आहे की, या गोळ्यांचा वापर करणाऱ्या प्रत्येक 1 लाख महिलांपैकी साधारणपणे 7 अतिरिक्त महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होतो.
advertisement
वापर बंद केल्यावरही धोका
संशोधनातून हेही समोर आले आहे की, गोळ्यांचा वापर थांबवल्यानंतरही 5 ते 10 वर्षांपर्यंत हा धोका कायम राहू शकतो. मात्र, वापर बंद केल्यावर धोका हळूहळू कमी होतो.
सर्वांना धोका नाही
हा धोका सर्व महिलांसाठी समान नाही. ज्या महिलांमध्ये स्तन कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास आहे किंवा ज्यांना इतर धोकादायक घटक आहेत, त्यांच्यासाठी हा धोका अधिक असू शकतो.
लहान वयात जास्त धोका
ज्या महिलांनी खूप लहान वयात गर्भनिरोधक गोळ्या घेणे सुरू केले आहे, त्यांच्यामध्ये हा धोका थोडा जास्त असू शकतो.
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
या अभ्यासानंतर डॉक्टरांनी महिलांना घाबरून न जाण्याचा सल्ला दिला आहे. प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती वेगळी असते. त्यामुळे, गोळ्यांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे, तसेच पर्यायी उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)