अफर्मेशन्सची ही प्रक्रिया केवळ तात्पुरती नसून नियमित सरावाने आपली मानसिकता कायमस्वरूपी सकारात्मक बनवते. यामुळे आपण आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो आणि जीवनात अधिक आनंद अनुभवू शकतो. आज आम्ही तुम्हाला या अफर्मेशन्सचे फायदे सांगणार आहोत.
ॲफर्मेशन्सचे फायदे..
- नियमितपणे ॲफर्मेशन्स बोलल्याने तुमचा स्वतःवरील विश्वास वाढतो. तुम्ही तुमच्या क्षमतांवर अधिक विश्वास ठेवू लागता.
advertisement
- सकारात्मक विचारसरणीमुळे तणाव आणि चिंता कमी होते. ॲफर्मेशन्स तुम्हाला शांत आणि सकारात्मक राहण्यास मदत करतात.
- ॲफर्मेशन्स नकारात्मक विचारांच्या चक्रातून बाहेर पडण्यास मदत करतात. ते तुमच्या मनाला सकारात्मक दिशेने वळवतात.
- जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयांशी संबंधित ॲफर्मेशन्स बोलता, तेव्हा तुम्ही ती ध्येये साध्य करण्यासाठी प्रेरित राहता.
ॲफर्मेशन्सचा वापर कसा करावा?
स्पष्ट आणि सकारात्मक वाक्ये निवडा : 'मी माझ्या कामात यशस्वी होत आहे' असे स्पष्ट वाक्य निवडा. 'मी अपयशी होणार नाही' असे नकारात्मक वाक्य टाळा.
वर्तमान काळात बोला : नेहमी 'मी आहे' किंवा 'मी करतो' अशा वर्तमान काळातील वाक्यांचा वापर करा.
भावना जोडा : ॲफर्मेशन बोलताना त्यामध्ये भावना मिसळा. ते वाक्य खरोखरच घडत आहे असे अनुभव करा.
नियमित सराव करा : रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे ॲफर्मेशन्सचा सराव करा. आरशासमोर पाहून बोलल्यास अधिक प्रभावी ठरू शकते.
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.