इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत जुबेर वळसंगकर हे गेल्या दोन वर्षांपासून समाजसेवा करत आहेत. काम करत करत जुबेर यांना समाजसेवा करायचा निर्णय घेतला. 2020 रोजी झुसासी एनजीओची स्थापना केली. जुबेर यांनी संस्था स्थापन केल्यावर वंचित मुलांचे जीवन बदलण्याचा निर्णय घेतला.
मुंबईत इथं नवरात्रीसाठी 40 डिझाईन्स, ज्वेलरी मिळतायत फक्त 100 रुपयांत!
advertisement
गरीब वंचित मुलांचा शिक्षणाचा खर्च असो किंवा शाळेत लागणारे साहित्य असो ते देण्याचे काम जुबेर यांच्या एनजीओने सुरू केले. तसेच प्रत्येक शाळेत जाऊन मुलींना गुड टच आणि बॅड टच यांची देखील माहिती देण्याचे काम जुबेर यांची झुझासी एनजीओ करत आहे. आतापर्यंत या एनजीओने 700 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे सक्षम बनवले तसेच 6000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे. जुबेर यांच्या एनजीओमध्ये 100 पेक्षा अधिक स्वयंसेवक मोफत काम करत आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि योग्य पोषण मिळावे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे अधिकार आहे. हेच उद्देश लक्षात ठेवून झुसासी एनजीओ काम करत आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या परिसरात असणाऱ्या गरजू गरीब विद्यार्थ्यांची मदत करून त्यांना उच्च शिक्षण कसे देता येईल. एवढी जरी मदत नागरिकांनी केली तर नक्कीच चांगला समाज आपण घडवू शकतो, असा सल्ला झुझासी एनजीओचे अध्यक्ष जुबेर वळसंगकर यांनी दिला आहे.