एक्स्ट्रा-वाईड कंगवा : जर तुमचे केस कुरळे किंवा व्हेवी असतील, तर बारीक दातांचा कंगवा वापरल्यास केस तुटू शकतात किंवा खूप जास्त फ्रीझ (तुळतुळीत) होऊ शकतात. यासाठी रुंद दातांचा कंगवा (Extra-wide tooth comb) सर्वात चांगला असतो. यामुळे केस आरामात सुटतात आणि कुरळेपणाही टिकून राहतो.
फाईन-टूथ कंगवा : सरळ आणि पातळ केसांसाठी बेस्ट सरळ, पातळ किंवा फ्लॅट केसांसाठी बारीक दातांचा कंगवा (Fine-tooth comb) सर्वात योग्य असतो. यामुळे केसांची पार्टिंग (भांग पाडणे) आणि स्टाइलिंग खूप स्वच्छ होते आणि केसांमध्ये स्मूदनेस (गुळगुळीतपणा) टिकून राहतो.
advertisement
डिटॅंगलिंग कंगवा : ओल्या आणि कमजोर केसांसाठी आवश्यक ओले केस सर्वात जास्त कमजोर असतात आणि तुटण्याचा धोका जास्त असतो. अशा केसांसाठी डिटॅंगलिंग कंगव्याचा (Detangling comb) वापर करा, जो केसांना जास्त जोर न लावता सहजपणे सोडवतो आणि तुटण्यापासून वाचवतो.
लाकडी कंगवा : प्रत्येक प्रकारच्या केसांसाठी फायदेशीर लाकडी कंगवा प्रत्येक प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त असतो. तो स्कॅल्पची (टाळूची) मालिश करतो, स्टॅटिक (स्थिर विद्युतभार) कमी करतो आणि केसांमधील नैसर्गिक तेल संपूर्ण डोक्यात समान रीतीने पसरवण्यास मदत करतो, ज्यामुळे केस चमकदार आणि निरोगी दिसतात.
टेल कंगवा : स्टाइलिंग आणि पार्टिंगसाठी खास जर तुम्हाला केसांमध्ये क्लीन पार्टिंग हवी असेल किंवा तुम्ही अशी कोणती स्टाइलिंग करत असाल ज्यात केसांना सेक्शनमध्ये विभागणे गरजेचे आहे, तर टेल कंगवा (Tail comb) सर्वात उत्तम साधन आहे. तो पातळ आणि टोकदार असतो, ज्यामुळे पार्टिंग सहजपणे होते.
जसं चेहऱ्याच्या काळजीसाठी योग्य क्रीम आणि क्लीन्झर गरजेचं असतं, त्याचप्रमाणे केसांसाठीही योग्य कंगव्याची निवड करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमच्या केसांच्या टेक्सचरनुसार योग्य कंगवा निवडला, तर केस गळणे, गुंता होणे आणि तुटणे बऱ्याच अंशी कमी करता येतं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कंगवा खरेदी करायला जाल, तेव्हा फक्त हे लक्षात ठेवा की तुमच्या केसांसाठी कोणता कंगवा परफेक्ट आहे.
हे ही वाचा : केस गळतीची समस्या कायमची संपवा! रोज सकाळी फाॅलो करा 'हे' रूटीन; लांब अन् दाट केसांचं स्वप्न होईल पूर्ण!
हे ही वाचा : शेव्हिंगनंतर त्वचा कोरडी पडते? चिंता नको, करा 'हे' देशी उपाय; चेहरा होईल मऊ आणि चमकदार!