सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार I-Pill किंवा Unwanted 72 सारख्या गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्री आणि वितरणाच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि त्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार आहेत. सीडीएससीओच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नियमात बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. तसे मेसेजही फिरत होते.
औषध नियमांच्या शेड्यूल 'एच' आणि 'के' अंतर्गत हार्मोनल गर्भनिरोधकांच्या विक्रीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आल्याच्या माहितीचा अर्थ काही अहवालांनी अत्यंत चुकीचा लावल्याचंही यावेळी ऑर्गनायझेशनकडून सांगण्यात आलं. त्यामुळेच I-Pill किंवा Unwanted 72 या गोळ्या मेडिकलमध्ये ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहेत. त्या नियमात कोणताही सध्या बदल करण्यात आला नाही असं सांगण्यात आलं आहे.
advertisement
गर्भनिरोधक औषधांमध्ये Centchroman आणि Ethinyl estradiol या दोन्ही गोळ्या शेड्यूल H अंतर्गत येतात, याचा अर्थ त्या विनाप्रिस्क्रिप्शन शिवाय त्या विकण्यासाठी बंदी आहे. त्यासाठी कंपल्सरी प्रिस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे. H अंतर्गत नियमात बदल करण्यात आले आहेत. अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही ओषधं तुम्हाला डॉक्टरांच्या परवानगीशिवाय देता येणार नाहीत.
