जागतिक आरोग्य संघटनेच्याही (WHO) मार्गदर्शक सूचनांमध्ये लहान मुलांना कफ सिरप (Cough Syrups) न देण्याचा सल्ला दिला आहे.
याच विषयावर दिल्ली एम्समधील माजी पीडियाट्रिक तज्ज्ञ यांचीशी संवाद साधला असता त्यांनी पालकांच्या काही कॉमन प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.
मुलांना खोकला का होतो?
तज्ज्ञांच्या मते, मुलांमध्ये खोकला होण्याची अनेक कारणं असतात. त्यात वायरल इन्फेक्शन, एलर्जी, थंड पदार्थांचं सेवन यांचा समावेश आहे. हवामान बदलल्यावर अनेक विषाणू सक्रिय होतात, जे श्वासावाटे शरीरात जाऊन खोकल्याचं कारण ठरतात.
advertisement
मुलांना लगेच कफ सिरप द्यावं का?
तज्ज्ञ सांगतात की मुलांना खोकला झाल्यावर लगेच सिरप देऊ नये. सुरुवातीला घरगुती उपाय करून पहावेत. यामध्ये मुलाला वाफ (स्टीम) द्या, यामुळे कफ मोकळा होतो. गळ्यावर हलकं मफलर किंवा उबदार कपडा बांधा. धूळ-धूर आणि प्रदूषणापासून दूर ठेवा.
जर खोकला 5-7 दिवसांपेक्षा जास्त टिकला, ताप आला किंवा श्वास घेण्यास त्रास झाला, तर त्वरित डॉक्टरांकडे नेणं आवश्यक आहे.
5 वर्षांखालील मुलांना कफ सिरप का देऊ नये?
WHO च्या गाईडलाइन्सनुसार 5 वर्षांखालील मुलांना कोणताही कफ सिरप देण्याची शिफारस नाही. चुकीचं सिरप दिल्यास मुलांना झोप येणे, चक्कर येणे, अगदी लिव्हर आणि किडनीवरही वाईट परिणाम होऊ शकतो. डॉ. राकेश सांगतात की लहान मुलांमध्ये खोकला बहुतेक वेळा आपोआप बरा होतो. पण तो दीर्घकाळ टिकल्यास फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध द्यावं.
घरगुती उपाय कोणते करता येतील?
मुलाला वारंवार हलकं कोमट पाणी द्या. लक्षात ठेवा जास्त गरम पाणी नको. एक वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना थोडं मध आणि लहानसा आल्याचा तुकडा देणं फायदेशीर ठरू शकतं. हे उपाय फक्त २ दिवस करा; सुधारणा न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हर्बल आणि आयुर्वेदिक सिरप सुरक्षित आहेत का?
डॉ. जुगल किशोर यांच्या मते, हर्बल किंवा आयुर्वेदिक सिरप तुलनेने सुरक्षित मानले जातात. मात्र, त्यांमुळेही काही मुलांना एलर्जी किंवा पचनाचे त्रास होऊ शकतात. त्याचं जास्त प्रमाणात सेवन धोकादायक ठरू शकतं.
लहान मुलांना खोकला झाला की घाईत कफ सिरप देणं टाळा. आधी साधे आणि सुरक्षित घरगुती उपाय वापरा. तरीही त्रास कमी झाला नाही तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं सर्वांत योग्य आहे. स्वतःहून औषधं देणं कधीही टाळा.